नगरपालिकेने नोटीस दिल्यानंतरही बस स्टॉप परिसरातील अवैध बांधकाम सुरूच…

देसाईगंज : उत्कर्ष प्रतिनिधी देसाईगंज – बस स्टॉप परिसरातील मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाला नगरपरिषद देसाईगंज तर्फे नोटीस देऊन कागदपत्र सादर करण्याचे आणि सदर अवैद्य बांधकाम त्वरित बंद करण्याचे आदेश देण्यात आले.

परंतु सदर बांधकाम मागील पेक्षा दुपटीने आणि जास्त मजूर लावून ताबडतोब करण्याचे कामसुरू आहे. सदर अवैद्य बांधकाम करता नगरपालिकेच्या आदेशाला न जुमानता ” देख लेंगे ” च्या शब्दात काही मोठ्या लोकांना सोबत घेऊन सदर अनाधिकृत बांधकाम करीत आहे. सदर बांधकाम करताना राष्ट्रीय महामार्गाची जागाही सोडण्यात आलीं नसून तसेच बांधकामच्या स्लॅप जवळून विद्युत लाईन गेल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. तरी याकडे प्रशासनाने बारकाईने लक्ष द्यावे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *