भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश,महाराष्ट्र राज्य संघटनेच्या विविध पदाधिकारी यांची नियुक्ति जाहिर…

धुळे : सबला उत्कर्ष (प्रतिनिधी ) : भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश, महाराष्ट्र राज्य संघटनेच्या विविध पदाधिकारी यांची नुकतीच नियुक्ति करण्यात आली असून यांची नुकतीच 3 वर्ष कालावधी करीता नियुक्ति करण्यात आली आहे.संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब रघुनाथ कांबळे,तसेच उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष बंटी दिलेर नेतलेकर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात येवून गौरविन्यात आले.सामाजिक बांधिलकीने तळागाळातील समविचारांना एकत्रीत करुन,देश हितार्थ. जनहितार्थ सत्यनिष्ठेने, इमानदारीने व प्रामाणिकपणाने कार्य करून संघटनेच्या रोपटयाचे वटवृक्षात रूपांतर करण्यासाठी भारत सरकार मान्यताप्राप्त,भ्रष्टाचार विरोधी जनआक्रोश,महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या धुळे जिल्हा महिला कायदा सल्लागारपदी अँड.ज्योत्सना आबा पारधी यांची 3 वर्षा करीता निवड करण्यात आलेली आहे.तसेच नंदुरबार तालुका महिला उपाध्यक्ष पदी दर्शना कमलेश शिंपी,शिंदखेडा तालुका उपाध्यक्ष प्रकाशचंद्र सिताराम सैदाने,उत्तर महाराष्ट्र सल्लागार पदी अँड.मिलिंद देवीदास सोनवणे(‘कोळी ),तर उत्तर महाराष्ट्र वेब पोर्टल सोशल मीडिया प्रमुख पदी संभाजी सुकलाल देवरे, धुळे जिल्हा उपाध्यक्ष पदी किशोर दौलत भिल व शिंदखेडा तालुका महिला अध्यक्ष पदी पूनम आनंदा पाटिल यांची नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्ती बद्दल संघटनेच्या पदाधिकारी यांचेसह सर्व स्थरातून अभिनंदन व शुभेच्छाचा वर्षाव होत आहे .

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *