यूपीतील हाथरसची घटना निंदनीय व लज्जास्पद… योगी सरकार चा जाहीर निषेध – वंदनाताई चौधरी


नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी…
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते व वंदनाताई चौधरी यांची मागणी.

औरंगाबाद :- सबला उत्कर्ष न्यूज…
राजश्री चौधरी.
आज औरंगाबाद येथील आयुक्तालयात जाऊन उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यातील चंपा या गावी 19 सप्टेंबर रोजी एका निरागस तरुणीवर नराधमांनी अमानवीय कृत्य केल्याने उपचारादरम्यान मंगळवार 29 सप्टेंबर रोजी मुलीची प्राणज्योत मावळली. नराधमांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केली.


तसेच आज औरंगाबाद येथे आयुक्तालयात राष्ट्रवादी काँग्रेस च्या महिला पदाधिकारी यांनी बांगड्या भरो आंदोलन केले तसेच योगी सरकारच्या निषेध नोंदवित निवेदन दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा , यांच्या विरोधी घोषणा दिल्या या नंतर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी च्या प्रदेशाध्यक्ष रुपालिताई च्या आदेशाने कार्यकर्त्यांनी पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन योगी आदित्यनाथ उ. प्रदेश चे मुख्यमंत्री यांना तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढत्या महिला अत्याचारा बाबत कठोर कारवाई व्हावी असे पत्र दिले व जाहीर निषेध व्यक्त केला.

वंदनाताई चौधरी(पाटील)
प्रदेश सचिव तथा
बुलढाणा जिल्हा निरीक्षक

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *