अहेरी शहरात १००% कडकडीत बंद..!! जनता – कर्फ्यूला व्यापारी आणि जनतेनी दिला उस्फुर्त प्रतिसाद…

आशिष सुनतकर
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली :- सबला उत्कर्ष न्यूज…

अहेरी:-
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अहेरी शहरात व्यापारी संघटना अहेरी तर्फे पुकारण्यात आलेल्या ७ दिवसीय जनता कर्फ्युच्या आजच्या पहिल्या दिवशी शहरात उस्फुर्त प्रतिसाद मिळाला,ह्या बंदला व्यापाऱ्यांनी आणि जनतेनी दिलेल्या मोठ्या पाठींब्यामूळे आज अहेरी शहरातील संपूर्ण बाजारपेठ १००% कडकडीत बंद होती, आज दिवसभर शहरातील सर्वच रस्त्यावर लोकांची आणि वाहनांची खूपच कमी गर्दी दिसत होती, आवश्यक काम असेल तरच लोकं घराबाहेर पडत होते..!!


शहरातील किराणा दुकाने, जनरल दुकाने, कापड दुकाने, हार्डवेअर दुकाने, हॉटेल्स, भाजीपाला दुकाने, पानठेले, चहा दुकाने हे 100% कडकडीत बंद होते, ह्या जनता कर्फ्युला व्यापाऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिल्याबद्दल अहेरी शहरातील सर्व व्यापाऱ्यांचे आणि जनतेचे व्यापारी संघटना अहेरी यांनी आभार मानले आहे..

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *