वीस दिवसांपासून म्हसावद – लमांजन परिसरात बिबट्याचा मुक्त संचार – नागरिकांमध्ये घबराहट …

बिबट्या.

म्हसावद -( सबला उत्कर्ष समाचार प्रतिनिधी संजय प्रकाश चौधरी)
पंधरा दिवसांपूर्वी म्हसावद येथील शेतकरी आबा एकनाथ सोनवणे यांचा सालदार वर बिबट्याने हल्ला केला होता. तसेच येथील भास्कर शामराव पाटील यांच्या बकरी वरती हल्ला केला होता. त्यात बकरी जखमी होऊन चार दिवसांनी बकरी मयत झाली होती. आज लमांजन गावा जवळील अर्धा किलोमीटर अंतरावर शेतकरी निंबा ठाकरे यांच्या मक्याच्या शेतात जंगली डुकराची शिकार केली असल्याचे लमांजन येथील शेतकऱ्याने मध्ये चर्चा सुरू आहे. या ठिकाणी नागरिकांकडून फटाके फोडून बिबट्याला पळविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे गोरख पाटील यांनी सांगितले यादरम्यान याबाबत वन खात्याने लवकरात लवकर बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी परिसरातील शेतकरी व नागरिकांकडून मागणी होत आहे.

तसेच जळगाव तालुक्यातील म्हसावद पासून पाच किलोमीटर अंतरावरील लमांजन रस्त्यावर आज बिबट्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण केली आहे.
तसेच आज संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शिरसोली येथील माजी उपसरपंच पाटील यांच्या लमांजन येथील शिवारातील शेतात कपाशी मधून म्हसावद येथील शेतकरी निंबा ठाकरे दापुरा फाटा यांच्या मक्का मध्ये जाताना लंमाजन येथील नाना शामराव पाटील यांना दिसला त्यांनी लागलीच माझी उपसरपंच गोरख निंबा पाटील यांना फोन द्वारे माहिती दिली. गोरख यांनी लमांजन येथील पोलीस पाटील भाऊराव आधार पाटील यांना कळवले..
यामुळे नागरिकांमध्ये घबराट पाहुन वन खात्याकडून बिबट्यांचा बंदोबस्त व्हावा याची नागरिकांनी केली मागणी.

Mhasawad shivar..
0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *