भोरगाव लेवा पंचायतीच्या मध्यस्तीने गरीब दांपत्याचा मोडकळीस आलेला संसार फुलला ;


भुसावळ(प्रतिनिधी)- सबला उत्कर्ष ;
येथील प्रशांत दगडू नारखेडे व फुलगाव येथील सौ. रूपाली उर्फ जयश्री यांचा विवाह २०१९ मध्ये झाला. विवाह पश्च्यात दोघामध्ये कायम कुरबुरी सुरू झाल्या वाद झाले हे वाद विकोपाला गेले व रूपाली माहेरी नीघून गेली.
दरम्यान ती गर्भवती असल्याचे समजले. दोन्हीकडचे लोक एकमेकांवर दोषारोप ठेवत असत.
शेवटी कंटाळून हे दोन्ही कुटुंब “भोरगाव लेवा पंचायत” , भुसावळ शाखेत घटस्फोटासाठी पोहोचले व त्यांनी आपल्या व्यथा भोरगाव लेवा पंचायतीकडे मांडल्या. पंचायतीचे सदस्यांनी सर्व हकीकत एकूण अतिशय उत्तम रितीने समुपदेशन करून दोघ बाजुच्या लोकांना व घटस्फोट घेणाऱ्या नवरा बायकोला समजावले व उभयतांमध्ये समेट घडवून आणला एक संसार मार्गी लावला व होणा-या बाळाला आई वडीलांचे छत्र मिळवून दिले.
अत्यंत छोट्या छोट्या गैरसमजातून असे मोठे मोठे चुकीचे निर्णय घेतले जातात पण त्या वेळी जर अशा प्रकारे समजूत घालणारे हात पाठीवर असतील अनेक आयुष्य सावरू शकतात. सौ.आरती चौधरी यांनी सांगितले . गैरसमजातुन मोडकळीस येणारे संसार मार्गावर आणल्याबद्दल एक वेगळेच समाधान व आनंद होतो असे पंचायतीचे सदस्य सुहासदादा चौधरी, निळूभाउ फालक, डाॅ. बाळू पाटील यांनी सांगितले.
सौ. आरती चौधरी यांनी विवाहिता सौ. रूपालीला पेढा भरवून पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात.
आता पर्यंत अशा प्रकारे अनेक संसार मार्गावर आणण्याचे श्रेय भोरगाव लेवा पंचायततीला मिळाले आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *