ऑल इंडिया यूथ फेडरेशन तर्फे पंतप्रधानांचा वाढदिवस हा “राष्ट्रीय बेरोजगार दिवस” म्हणून साजरा…


ऑल इंडिया यूथ फेडरेशन तर्फे पंतप्रधानांचा वाढदिवस हा “राष्ट्रीय बेरोजगार दिवस” म्हणून साजरा.

सबला उत्कर्ष प्रतिनिधी ( भावेश पाटील ) :- 2014 मध्ये पंतप्रधान यांनी निवडणुकीमध्ये दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे आश्वासन देऊन सत्तेत विराजमान झाले. पण दोन कोटी रोजगार देण्याचे सोडून द्या 20 कोटी रोजगार त्यांनी देशातील अर्थव्यवस्था डबघाईला आणून तरुणांच्या कडून हिरावून घेतले आहेत. त्यामुळे त्यांचा 17 सप्टेंबर आज वाढदिवस आहे हा देशभरचे तरुण हा राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करतात.

म्हणून कोल्हापुरात देखील फेडरेशनच्या वतीने पंतप्रधानांचा केक कापून, काळी फिती लावून बेरोजगार तरुणांनी वाढदिवस साजरा केला. विशेष म्हणजे 500रुपयच्या केकचे पैसे हे बेरोजगारांनी बिंदू चौकात भीक मागून गोळा केले. ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी देशाची व्यवस्था उद्ध्वस्त करून केवळ विविध बँकांच्या कर्ज वरती देश चालवत आहे. त्याअर्थी त्यांना भीक मागून त्यांना पैसे जमा करून असे प्रतीकात्मक आंदोलन झाले.
यावेळी बोलताना गिरीश फोंडे म्हणाले,” रेल्वे, एलआयसी, बीएसएनएल, एअर इंडिया, हिंदुस्तान पेट्रोलियम अशा सार्वजनिक कंपन्या विकून पंतप्रधान देशाची मालमत्ता विकत आहेत पण तेथील रोजगार देखील संपवत आहे. या रोजगार बरोबरच घटनेने दिलेले आरक्षणाच्या जागा देखील संपत आहेत. 20 कोटी बेरोजगार झालेल्या तरुणांना रोजगार देऊन व बेरोजगारांना बेरोजगार भत्ता द्यावा अन्यथा राजीनामा द्यावा.”
प्रशांत आंबी म्हणाले,” पुराणकाळात असंघटित क्षेत्रातील अनेक लोकांनी गावी परतताना मृत्यूला सामोरे गेले याची आकडेवारी देखील सरकारकडे नाही या सरकारचा धिक्कार असो.” युथ फाउंडेशन चे उपाध्यक्ष राम करे म्हणाले,” केवळ सुशांत सिंगच्या आत्महत्येत मग्न असलेले मोदी सरकार गेल्या दोन वर्षात बेरोजगार तरुणांनी विक्रमी आत्महत्या केल्या आहेत. यापासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवत आहेत व मोरांच्या बरोबर फोटो काढत आहेत.”
यावेळी विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला. हॅपी बर्थडे टू यु असे गाणे देखील तरुणांनी गायले, रोजगार आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचा, तरुणांना बेरोजगार करणाऱ्या मोदी सरकार राजीनामा द्या, रोजगार हमी योजना लागू करा, 20 कोटी बेरोजगारी लागणाऱ्या पंतप्रधानांचा धिक्कार असो अशा घोषणा दिल्या
यावेळी आरती रेडेकर, धीरज कठारे, रजत शेख, संदेश माने, संतोष आंबेकर, केदार तहसीलदार, सुनील कोळी, प्रशांत वाघोळे, निलेश गरड, अमोल देवडकर, आकाश कांबळे,सौरभ माने इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *