मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी…

मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी…

पणजी : सबला उत्कर्ष ब्युरो :- राजकीय व्यक्तींना धमकी येणे ही काही नवी नाही मात्र थेट मुख्यमंत्र्यांना धमकी येणे हा शोधाचा विषय आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना ठार मारण्याची धमकी देण्याचा मसेज त्यांच्या फोनवर आला आहे.

मुख्यमंत्री स्वीय सहाय्यक आत्माराम बर्वे यांनी पणजी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. याप्रकरणी पणजी पोलिसांनी भारतीय दंडसंहिता कलम 504, 507 आणि 384अंतर्गत गुन्हा नोंदवून घेतला असून तपास सुरू केला आहे.

या धमकी प्रकरणात धमकी देणारा कोण अद्यापही समोर आले नसून धमकी देणारा कोण याचे तक्रारीत काही नाव नमूद करण्यात आलेले नाही. मात्र 5732038836 या क्रमांकावरून धमकीचा मेसेज आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या नंबर वरून पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *