राजकुमारीच्या घरातच चोरी !

राजकुमारीच्या घरातच चोरी !

दिल्ली : सबला उत्कर्ष – चोरटे कोणाच्या घरात डल्ला मारतील हे नक्की नसते. ज्या ठिकाणी सर्वाधिक मान सापडेल त्या ठिकाणी चोरटे हात मारून नेतात. या चोरीमध्ये त्यांचे अनेक वेळा होते तर एखाद्या वेळेस हाती सापडले जाण्याची शक्यताही असते.

सौदीच्या राजकुमारीच्या पॅरिस मध्ये असलेल्या घरात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली आहे. राजकुमारी घरात नसताना चोरांनी घरातील कोट्यवधींचे सामान चोरून नेले आहे. राजकुमारीच्या घरात चोरी झाल्याने एकच खळबळ उडाली असून चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिस सरसावली आहे. मात्र या चोरीचा दसका राजकुमारीने घेतला असून ती रुग्णालयात भरती करण्यात आली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सौदीची 47 वर्षीय राजकुमारी गेल्या ऑगस्टपासून घराकडे फिरकलेली नाही. तिच्या घरामध्ये लाखो रुपयांचे हार, घड्याळे, दागिने आदी होते. या साऱ्या मौल्यवान वस्तूंची किंमत €600,000 युरो होती. राजकुमारी जेव्हा घरी आली तेव्हा घरफोडी झाल्याचे समजले. आत जाऊन घरातील मौल्यवान वस्चूंची पाहणी केली, तर ते गायब असल्याचे आढळले. ही हायप्रोफाईल चोरी असल्याचे लक्षात आले असून चोरट्याचा शोध घेण्यासाठी पॅरिस पोलीस शक्कल लढवत आहेत.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *