५७ लाखांचा गुटखा लवकरच नष्ट करणार अप्पर पोलिस अधीक्षक सचिन गोरे यांची माहिती…


चाळीसगाव प्रतिनिधी : सबला उत्कर्ष न्युज प्रतिनिधी : – धुळ्याकडून चाळीसगावकडे येणारा सुमारे ५७ लाख ८६ हजारांचा विमल गुटखा व ९ लाखांचा ट्रक असा ६६ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल जळगाव एलसीबीने जळगाव जवळ पकडला होता.

याप्रकरणी ट्रक चालक व क्लिनरवर जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. हा गुन्हा मेहुणबारे पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला.

यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून रविवारी न्यायालयात हजर केले असता त्यांची जामीनावर सुटका झाली.

जळगाव येथील एलसीबी पथकाने सिनेस्टाइल पाठलाग करून गुटख्याची वाहतूक करणारा ट्रक जळगावजवळ पकडला होता.

हा गुन्हा जिल्हापेठ पोलिस ठाण्यातून शून्य क्रमांकाने मेहुणबारे पोलिसांकडे वर्ग झाला. यानंतर मेहुणबारे पोलिसांनी दोन्ही आरोपींसह मुद्देमाल ताब्यात घेतला.

दरम्यान, जप्त केल्या गुटख्याबाबत पोलिसांनी अन्न व औषधी विभागाशी संपर्क साधला आहे. त्यांनी जप्त केलेल्या गुटख्याचे नमुने तपासणीसाठी पाठवून न्यायालयाच्या परवानगीने तो नष्ट करावा, असे कळवल्याची माहिती अप्पर पोलिस अधीक्षक सचिन गोरे यांनी दिली. तपास डीवायएसपी कैलास गावडे करत आहेत.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *