जळगावातील राष्ट्रवादीच्या महानगराध्यक्षाला बलत्काराच्या खटल्यात गोवण्याचा प्रयत्न : गुन्हा दाखल…

जळगाव प्रतिनिधी : सबला उत्कर्ष न्युज :- जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांना बलत्काराच्या खटल्यात गोवण्याचा प्रयत्न काही लोक करीत असल्याचा आरोप अभिषेक पाटील यांना केल्याने जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे.

जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मी जळगाव विधानसभा निवडणूक २०१९ ची लढलो असून सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचा जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष म्हणून १५ जानेवारीपासून काम करत आहे.

काल ( दि १५ ) मी मुंबईहून येत असताना मला माझ्या ९७६९७३३३३ यान नंबर वर रात्री ९ वाजता ७७०९२६५६९४ या नंबर वरून कोणी शाकंभरी सुर्वे नामक महिलेचा फोन आला त्यावेळी त्या म्हटल्या कि अभिषेक भाऊ मला आपल्याशी काही पर्सनल काम आहे. मला आपली भेट घ्यायची आहे मी त्या महिलेस सांगितले कि आता मी बाहेरगावी आहे उद्या (दि १६) सकाळी काँग्रेस कार्यालयात यावे. नंतर (दि १६) सकाळी मी मला फोन आला व राष्ट्रवादी काँग्रेसचे ऑफिस बंद आहे आपण माझ्या रिंगरोडवरील ऑफिसला यावे असे सांगितले. त्यानंतर त्या महिलेने माझ्या ऑफिस मध्ये बसून सांगितले कि माझ्या कडे तुमचे काम आले आहे. परंतु मी ते करणार नाही कारण तुम्ही छान राजकीय काम करत आहात त्या मुळे तुमचे आयुष्य खराब करू इच्च्छित नाही. मी त्या महिलेला विचारले की आपण काय काम करतात त्यावेळी त्या महिलेने मला जे उत्तर दिले ते ऐकून मी अवाक झालो. कारण ती महिला मला म्हटली कि मी मोठ्या लोकांना मुली पुरवते ! त्या नंतर ती महिला मला म्हंटली कि मनोज वाणी (मनोकल्प फिश फार्म चे मालक) नामक माणसाने ऐंडव्हान्स पैसे देऊन एका मुलीमार्फत अभिषेक पाटील यांचे अश्लील फोटो आणि व्ही डिओ काढून हवे आहेत किंवा त्याच्या वर बलात्काराचा खोटा आरोप करावे जेणेकरून अभिषेक पारटीलचे राजकीय जीवन संपून जाईल असे सांगितले. त्या महिलेने मला तिच्या व्हाट्स अॅपमध्ये मनोज वाणी याने पाठवलेले माझे फोटो आणि माझा मोबाईल नंबर पाठ्वल्याचे दाखवले. मनोज वाणी आणि त्या महिलेच्या मागे कोणी तरी मोठा राजकीय वरदहस्त असल्याचे समजून येत आहे. या सर्व घटनाक्रमाची कडक चौकशी करून चुकीचे प्रकार करून कोणाचे राजकीय, सामाजिक किंवा कौटुंबिक जीवन संपवणार हे रॅकेट असल्याचे दिसून येते. या लोकांवर कायदेशीर कारवाई व्हावी म्हणून आपण पुढची पावले उचलणार असल्याचेही अभिषेक पाटील यांनी त्यांच्या या निवेदनात स्पष्ट केले आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *