कमलापूर येते पशु दवाखाना बांधकामचे भूमिपूजन…

आशिष सुनतकर
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली : सबला उत्कर्ष न्युज :-

गडचिरोली:-

    ?जिल्हा परिषद अध्यक्ष  श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या शुभ हस्ते.

?जिल्हा परिषद गडचिरोली अहेरी पंचायत समिती अतर्गत येत असलेल्या ग्राम पंचायत कमलापूर येते पशु दवाखाना मंजूर झाले असून सदर बांधकामाचे भूमिपूजन जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांच्या हस्ते करण्यात आली.
कमलापूर येते पशु दवाखाना नसल्याने शेतकऱ्यांना अडचण होत होती त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडावार यांनी जिल्हा परिषदेचे जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मंजूर करून देण्यात आले असून सदर कामाचे भूमिपूजन करण्यात आले असून येत्या काही महिन्यात सदर बांधकाम पूर्णपणे होऊन शेतकऱ्यांना सोईचे ठरणार आहे.
सदर भूमिपूजनाला अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे,जि.प.सदस्य अजय नैताम,जि.प.सदस्य सुनीता कुसनाके,प.स.सदस्य सौ.सुरेखा आलाम,वेडमपलीचे सरपंच श्री अजय मिशाल,जयराम आत्राम,ग्राम पंचायत सदस्या सौ.चिप्पावार ताई,कमलापूरचे प्रतिष्ठित नागरिक श्री.बक़या चौधरी,सुदीप रंगूवार,सचिन ओलेटीवार,सुधाकर बंडावार,इर्शाद शेख,दिवाकर आलाम,प्रभाकर मडावी,राकेश सडमेक,प्रकाश दुर्गे,तसेच कंत्राटदार सत्यनारायण गदेवार आदि गावातील प्रतिस्टित नागरिक उपस्थित होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *