सावित्रीबाई फुले जयंतीदिनी धरणगावात अनोखा उपक्रम. धरणगावात प्रकटल्या सावित्रीच्या लेकी – ८० महिला शिक्षिकांचा झाला सन्‍मान…

सावित्रीबाई फुले जयंतीदिनी धरणगावात अनोखा उपक्रम.
धरणगावात प्रकटल्या सावित्रीच्या लेकी.
८० महिला शिक्षिकांचा झाला सन्‍मान.

धरणगाव प्रतिनिधी, धनराज पाटील ( सबला उत्कर्ष ) –
:- येथील धरणगाव नगरपरिषद व महात्मा फुले युवा क्रांती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त महिला शिक्षिका सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी ८० शिक्षिकांना सावित्रीबाईंचे पुस्तक, पेन, गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या सर्व महिलांना साडी भेट देऊन त्यांचा सन्मान केला.
सविस्तर वृत्त असे की, येथील धरणगाव नगरपरिषद व सामाजिक संघटना महात्मा फुले युवा क्रांती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने धरणगाव शहरातील सर्व शाळांमध्ये शिकविणाऱ्या महिला शिक्षकांचा सन्मान सोहळा सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने करण्यात आला. या वर्षी महाराष्ट्र शासनाने सावित्रीबाई फुले जयंती ‘महिला शिक्षण दिन’ म्हणून घोषित केला. त्यानिमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. इयत्ता पहिली पासून ते पदव्युत्तर पर्यंत शिक्षण देणाऱ्या ८० महिलांचा सत्कार या ठिकाणी पार पडला. पालकमंत्री गुलाबराव पाटील, व्याख्याते दर्शना पवार, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगराध्यक्षा उषा वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी, युवा क्रांती मंच महिला अध्यक्षा प्रा. कविता महाजन उपनगराध्यक्षा कल्पना विलास महाजन, महिला, बाल कल्याण सभापती सुरेखा विजय महाजन व्यासपीठावर उपस्थित होते. सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. स्त्रिया आज सर्व क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रगती करत आहेत याच सर्व श्रेय सावित्री आईंना जाते, असं असे उद्गार पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी काढले. स्त्रियांचे मनोबल वाढविण्याचे काम सावित्रीबाईंनी केल्याचे उषा वाघ यांनी अध्यक्षीय भाषणात म्हटले. सत्कारार्थींमधून प्रा. ज्योती महाजन, ज्योती जाधव, संगीता न्हायदे, प्रियंका गजरे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. कविता महाजन, सूत्रसंचालन रुपाली प्रभाकर पाटील, देवश्री रमेश महाजन, कुंदबाला नरेंद्र पाटील यांनी केली नगरसेविका कीर्ती मराठे यांनी आभार मानले.
विशेष – कार्यक्रमाचे सर्व नियोजन महिलांनी केले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *