सावित्री बाई फुले यांची जयंती व महिला शिक्षक दिन जामनेर शहरात पंचायत समिति समोर साजरी करण्यात आली…

जामनेर : सबला उत्कर्ष न्यूज :- सावित्री बाई फुले यांची जयंती व महिला शिक्षक दिन जामनेर शहरात पंचायत समिति समोर साजरी करण्यात आली . यावेळी पुरोगामी विचाराच्या वारसदारानी मोठ्या सांखेने हजेरी लावली होती .राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चे सामाजिक न्याय सेल चे तालुका अद्यक्ष संदिप हिवाले यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात सर्वप्रथम सावित्री बाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन राष्ट्रवादि कांग्रेस च्या ,प्रदेश सचिव वंदना ताई चौधरी ,राष्ट्रवादी भटके विमुक्त सेल च्या प्रदेश सरचिटणीस ऐश्वर्या राठोड़, कविता बोरसे यांनी प्रतिमा पूजन करुण कार्यक्रमाची सुरवात केली .प्रतिमा पुजन झालेवर इतिहास अभ्यासक किशोर तायड़े, डॉक्टर बाजीराव पाटिल ,प्रदिप गायके , वंदना चौधरी यांनी आपल्या मनोगतात राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले ,सावित्री बाई फुले दाम्पत्य यांच्या सामाजिक परिवर्तनाची यशोगाथा सांगून त्यांच्या कार्याची माहिती सांगितली तर आज महाविकास आघाडि ने महिला शिक्षक दिन म्हणून साजरा करण्याचे जाहिर केले बद्दल आभार मानले .तर आज देशात सर्वच क्षेत्रात महिलांना जे मानाचे स्थान मिळत आहे त्याचे सर्व श्रेय हे क्रांति ज्योति सावित्री फुले यांना जाते असेही त्यांनी आवर्जून सांगितले . आज त्यानिमित्ताने महिलांना प्रमाण पत्र देऊन गौरवन्यात आले यात कुमारी प्रियंका अनिल निकम B sc विद्यापीठात 2 री ,सौ कविता प्रल्हाद बोरसे वाचनालय चालवतात यांचा सत्कार करण्यात आला .यावेळी विलास राजपूत, माधव chawan, अनिल बोहरा,योगेश पाटिल सर्, अर्जुन पाटिल, राजू नाईक, नटवर chawan, अमोल पाटिल, विनोद माळी, प्रभु jhalte, स्वामी पाटिल, विनोद पाटिल, विश्वनाथ शिंदे, किरण चौधरी, भूषण पांढरे, वैभव बोरसे, गणेश कुंवर, व्ही .पी .पाटिल, गजानन गव्हारे, दीपक रिचवाल (महाराज) डॉक्टर प्रशांत पाटिल, प्रदिप सोनवणे, दीपक माळी सर्, अशोक चौधरी ,काशीनाथ शिंदे ( फौजी),मनीष पाटिल, सिदार्थ सुरवाड़े, शुधोधन सोनवणे यांचेसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *