यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांना राजोरा प्रकरण भोवले? कर्तव्यात कसूर असल्याचा ठपका…

यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांना राजोरा प्रकरण भोवले? कर्तव्यात कसूर असल्याचा ठपका.

जळगाव : सबला उत्कर्ष ( मयूर वागूळदे ) :-तालुक्यातील राजोरा येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस १० ऑक्टोबर रोजी एका तरुणाने पळवून नेले होते. या गुन्ह्यात संशयितास १३ ऑक्टोबरला मुलीसह पोलिस ठाण्यात आणले होते. यावेळी पोलिस निरीक्षक अरूण धनवडे यांनी संशयितावर कारवाई केली नाही. मुलीची वैद्यकीय तपासणी देखील केली नाही. त्यामुळे मुलीच्या पालकांनी पोलिस निरीक्षक धनवडे यांची जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांच्याकडे तक्रार केली होती. या गुन्ह्याचा तपास फैजपूरचे डीवायएसपी नरेंद्र पिंगळे यांच्याकडे देण्यात आला. याप्रकरणी आमदार शिरिष चौधरी यांनी देखील गृहमंत्र्यांकडे तक्रार केली. हे सर्व प्रकरण निरीक्षक धनवडे यांना भोवल्याने बदली झाल्याची चर्चा आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *