माणुसकीला काळिमा फासणारी घटना-पहिले हत्या केली नंतर शरीर शिजवले…

माणुसकीला काळिमा फासणारी घटना-पहिले हत्या केली नंतर शरीर शिजवले.


दिल्ली : सबला उत्कर्ष – जगभरात दररोज माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना घडत असतात. अशीच एक घटना चीनमध्ये घडली असून एक 25 वर्षीय नाचणे तिच्या वरिष्ठ डॉक्टरची हत्या केली आणि त्यानंतर तिचे शरीरही शिजवले. या घटनेने संपूर्ण जगात एकच खळबळ उडाली आहे.

दक्षिण चीनमध्ये ली फेनपिंग या 25 वर्षीय नर्स गुआंग्सी झुआंगमधील यूलिन सिटीची आहे. ती आपातकालीन विभागात परिचारिका म्हणून कार्यरत होती. यादरम्यान वरिष्ठ डॉक्टर, ऑर्थोपेडिक्सचे उपप्रमुख लू युआनजेन यांच्याशी प्रेम संबंध जोडले गेले यातून शरीरसंबंध ही करण्यात आले होते.

ली फेनपिंग या नावाचा जुगार खेळण्याची मोठी सवय होती. त्यामुळे जुगारात हल्ल्याने तिच्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज सुद्धा झाले होते. त्यामुळे डॉक्टर सोबत असलेल्या शरीरसंबंधातून तिला पैसे मिळत होते. त्यानंतर डॉक्टरांनी हळू हळू ब्लॅकमेल करणे सुरू केले. डॉक्टरांनी केलेल्या ब्लॅकमेलमुळे नर्स खूप अस्वस्थ झाली.

या घटनेमुळे मनात बदल्याची आग निर्माण झाली. यातूनच वरिष्ठ अधिकारी असलेल्या डॉक्टरांची हत्या केली त्यानंतर त्याच्या शरीराचे काही भाग शिजविण्यात आला आला. काही भाग शिजवल्यानंतर टॉयलेटमध्ये मृतदेह फेकून दिला. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *