टेनिस बॉलमधून जेलमध्ये गांजा पोहोचण्याचा प्रयत्न फसला; पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या…

टेनिस बॉलमधून जेलमध्ये गांजा पोहोचण्याचा प्रयत्न फसला; पोलिसांनी तिघांना ठोकल्या बेड्या.

लढवतात. पण अनेकदा पोलिसांच्या सतर्कतेमुळं त्यांचे हे प्रयन्त हाणून पाडले जातात. कोल्हापूरच्या कळंबा मध्यवर्ती कारागृहात (Kalamba Central Jail) गांजा तस्करीचा असाच एक प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे.

कारागृहाच्या भिंतीजवळ क्रिकेट खेळण्याच्या बहाण्याने टेनिस बॉलमधून गांजा (Cannabis) कारागृहात पोहोचवण्याचा काहींचा प्रयन्त फसला आहे. गांजा पोहोचण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना कोल्हापूरमधील (Kolhapur) जुना राजवाडा पोलिसांनी (Police) अटक केली आहे. वैभव कोठारी, संदेश देशमुख आणि अमित पायगुडे अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. हे तिघेही संशयित पुण्याचे आहेत.
भरला. त्यानंतर कारागृहाच्या भिंतीजवळ क्रिकेट खेळताना मुद्दाम एक टोला हाणत गांजा भरलेला बॉल कारागृहात पोहचवण्याचा प्रयत्न या तिघा आरोपींचा होता. मात्र, पोलिसांनी वेळीच त्यांना हटकले आणि त्यांचे बिंग फुटले. पोलिसांनी त्यांच्याकडून हस्तगत केलेल्या बॉलमधून १५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. या आरोपींची कसून चौकशी सुरु असून त्यांच्याकडून अधिक माहिती मिळवण्याचा पोलीस प्रयन्त करत आहेत.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *