महानगरपालिकेतील सिडको,हडको भाग दुर्लक्षितच!

पाच नगरसेवक (लोकप्रतिनिधी) असूनही विकासकामांसाठी निधी कमी कसा मिळाला..?

नांदेड/गजानन जोशी ( सबला उत्कर्ष न्यूज )

नांदेड : मागील तीन वर्षांपासून महानगरपालिकेने नांदेड शहरासाठी कोट्यवधींचे पॅकेज जाहीर केले,मात्र शहरातील सिडको-हडको भागाला संपूर्णपणे दुर्लक्षित ठेवले असल्याचे समजते..

या भागात मागील तीन वर्षांपासून रस्त्यांची दुरुस्ती,ड्रेनेज दुरुस्ती,पाणी पुरवठा या मूलभूत गरजांविषयी महत्वाचे प्रश्न आहेत,लोकप्रतिनिधी नागरिकांना मदत करतात पण प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे काही प्रमाणात ही महत्वाची कामे होण्यासाठी प्रतिबंध मिळतो…

यात लोकप्रतिनिधी यांना निवडून आल्यानंतर सुरुवातीचा एक वर्षाचा कार्यकाळ हा नगरसेवकांचा ओळख होण्यासाठी जातो,त्यानंतर दुसऱ्या वर्षी अंदाजित ५० लाख ते १ कोटी रुपयांचेकाम झाल्याचे निदर्शनास येते पण हे काम एवढ्या पैस्यांचे असेल का? असे अनेक प्रश्न आहेत…

तिसरे वर्ष तर कोरोना काळ म्हणून लोकप्रतिनिधी यांनी घरात बसूनच घालवले,चालू असलेले चवथे वर्ष सध्या महानगरपालिका अर्थसंकल्प सादर केला जातोय यात यावर्षीतरी सिडको-हडको बाबत निधीची काही तरतूद आहे का? याभागात काँग्रेस नगरसेवक ३ तर भाजपा नगरसेवक २ आहेत..

या भागातील भाजपा नगरसेवक खासदार प्रतापराव चिखलीकर यांच्यामार्फत केंद्रीय निधी किंवा काँग्रेस नगरसेवक सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडून रस्ते सुधारण्यासाठी काही निधी मिळविणार का?

नाहीतर शेवटी प्रति वर्षाप्रमाणे सिडको हडकोतील जनतेच्या पदरी निराशाच राहणार का? असे अनेक प्रश्न जनतेला भेडसावत आहेत….

— चौकट —

शहरातील महानगरपालिकेला नाव लागून जोडलेला भाग म्हणजेच वाघाळा-सिडको-हडको भाग याभागातील विकास कामाच्या समस्यांबाबत वारंवार तक्रारी प्राप्त होतात,क्षेत्रीय अधिकारी यांचा निष्काळजीपणा असल्याने नागरिकांना त्यांच्या उद्भवत असलेल्या समस्यांना सामोरे जावे लागते,राहिला प्रश्न विकासाचा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार यांनी भाजपा सरकार काळात थेट निधी मिळवून देण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले व त्यास यशही मिळाले,पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी मागील १ वर्षाच्या कार्यकाळात सिडको-हडको भागाला एक रुपयांचा तरी निधी दिला का? इथे ३ नगरसेवक असूनही जर निधी मिळत नसेल तर जनतेच्या पदरी निराशाच राहील असे म्हणणे वावगे ठरणार नाही..

आयुक्त साहेबांनी याभागात प्रशासन म्हणून प्रवास वाढवावेत,निधी मिळवून देण्यासाठी अग्रेसर रहावे,स्वच्छते बाबत तक्रारी येत आहेत,त्या तक्रारी निरसन कश्या होतील,याविषयी सहायक आयुक्त यांना सम्पर्क साधून ही समस्या कशी निरसन होईल हे पहावे…

“मदतीसाठी २४ तास प्रशासन अशी संकल्पना राबवावी”

सिडको-हडकोचा विकास;हाच आपला ध्यास..

प्रविण साले
महानगराध्यक्ष
भाजपा,नांदेड

— चौकट —
पालकमंत्री साहेब व खासदार साहेब सिडको-हडको भागातील रस्त्यांची असलेली दुरावस्था पाहण्यासाठी एकवेळ दुचाकीवरून प्रवास करावा,कारण रस्ते चांगले नसल्याने निर्माण होणाऱ्या धुळीमुळे इथे राहणारी जनता जीव मुठीत घेऊन जगत आहेत…

गजानन जोशी
सदस्य
सिडको-हडको संघर्ष समिती

— चौकट —

रस्त्यांची दयनीय अवस्था याबाबत प्रशासकीय अधिकारी यांचे दुर्लक्षच आहे,त्यासोबतच लोकप्रतिनिधी यांचेही दुर्लक्षच राहते जनतेच्या पदरी निराशाच?

शेख मोईन लाठकर
सदस्य
सिडको-हडको संघर्ष समिती
तथा
सचिव,सिडको काँग्रेस कमिटी

— चौकट —

पहिलेच एम.आय.डी.सी च्या धुळीच्या त्रासाने त्रस्त असतानाच,रस्त्यांची धुळीचा त्रास म्हणजेच धुळीमुळे जनतेची गळचेपी होणार? रस्त्यांची दुरुस्ती झाली तर नक्कीच काही अंशी धुळीच्या त्रासापासून जनतेची मुक्तता होईल!

सुदर्शन कांचनगिरे
सिडकोतील त्रस्त नागरिक

— चौकट —

सिडको-हडकोतील जनतेला कोणी वाली आहे का? जिल्हाधिकारी,पोलीस-अधीक्षक, मनपा-आयुक्त यांनी कधीतरी या नांदेड शहराच्या भागात यावे,इथेही चांगले व सुशिक्षित लोक राहतात,लोकप्रतिनिधी यांचा तर कार्यकर्त्यांच्या घरगुती कामासाठीच दौरा होतो,त्याचेच छायाचित्रे सगळीकडे पाठविले जातात व या साहेबांचा दौरा झाला. असे लिहून मोकळे ते कशासाठी आले? काय केलं? जनतेच्या हितासाठी काय कामे केली? हे काहीच नाही! फक्त निवडणूक काळात मत मागायला यायचं,नंतर ४ वर्ष आळी-मिळी गुपचिळी असेच असल्याचे जाणवते…

शाम नायगावे
वंचित बहुजन आघाडी

— चौकट —
रस्ते,वीज,पाणी या मूलभूत गरजा लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी देण्यासाठी प्रयत्नशील रहावे,हडको शिवाजी महाराज पुतळा येथे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता छोटी पोलीस चौकी उभारावी…

वंदना कुलकर्णी
सामाजिक-कार्यकर्ती

— चौकट —
क्षेत्रीय कार्यालयातील सहायक अधिकारी यांनी सक्तीच्या कर वसुलीपेक्षा जनतेला सोयी-सुविधा कश्या मिळतील याबाबत आयुक्तांशी बोलून आराखडा तयार करूनच जनतेकडून कर वसुलीसाठी कंबर कसावी..

विकास नाही तर कर वसुली होऊ देणार नाही!

धीरज स्वामी
प्रसिद्धी प्रमुख
भाजपा,नांदेड

— चौकट —

जनतेनी निवडून दिले खरे,पण समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी समवेत प्रशासन सज्ज आहे का? आयुक्तांनी सिडको-हडको भागात पाहणी केली का? अतिक्रमण बाबत प्रशासन म्हणून काय भूमिका असेल?

सिद्धार्थ धुतराज
चिटणीस
भाजपा,नांदेड

— चौकट —

• सक्तीची कर वसुली असेल तर सोयी सुविधा द्या!

• ड्रेनेज समस्या नसावी व २४ तास पाणी पुरवठा हवा.

• अतिक्रमण बाबत काय भूमिका असेल?

• सिडको-हडको बाबत विकास आराखडा काय?

• याभागासाठी किती कोटींची तरतूद का नेहमी प्रमाणे लाखांमध्येच तरतूद करून जनतेच्या तोंडाला पाने पुसणार?

जीवन पा.घोगरे
माजी विरोधी पक्ष नेता
मनपा,नांदेड…

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *