प्रशिक्षणातून कार्यकर्त्यांना नवी भरारी… खा.उन्मेश पाटील

मंडल ३,७ आणि ८ आयोजित कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग कार्यक्रमात आत्मनिर्भर भारत विषयांवर खासदार उन्मेश दादा पाटील यांचे मार्गदर्शन.

जळगाव : सबला उत्कर्ष ( प्रवीण ठाकरे ) :- केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेजच्या माध्यमातुन तळागाळातील लोकांना घरपोच मदत दिली आहे. तरुण, महीला उद्योजक आर्थिक सक्षम करण्यासाठी नरेंद्र मोदींच्या माध्यमातुन नवीन संकल्पना राबविल्या आहेत. या सर्व घटकांना न्याय देणाऱ्या योजनेतून ज्यांना ज्यांना लाभ मिळाला आणि ज्यांना मिळाला नसेल त्यांच्यासाठी प्रयत्न करण्यासाठी प्रशिक्षण वर्गातून कार्यकर्त्यांना नवी उरारी मिळणार आहे. कार्यकर्त्यांनी आजच्या प्रशिक्षण वर्गातून मरगळ झटकून नवीन उत्साहाने पक्षाचे संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा खासदार उन्मेश दादा पाटील यांनी व्यक्त केले. आज एम आय डी सी परिसरातील आयोजित अयोध्या नगर क्र. 3, झुलेलाल नगर मंडल क्र.7 तसेच मेहरूण क्र.8 या कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण वर्ग कार्यक्रमात खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आत्मनिर्भर भारत विषयांवर आपले मनोगत व्यक्त करताना बोलत होते.यावेळी व्यासपीठावर नगरसेविका रंजनाताई वानखेडे, जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप भाऊ रोटे, जिल्हा सरचिटणीस नितिन इंगळे उपस्थित होते. याप्रसंगी अयोध्या नगर क्र. 3 चे अध्यक्ष प्रवीण कोल्हे, झुलेलाल नगर मंडल क्र.7चे संयोजक विकी सोनार, मेहरूण क्र.8 चे अध्यक्ष विनोद मराठे तसेच कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *