एकही शेतकरी कापूस मोजणीपासून वंचित राहणार नाही – ना. गुलाबराव पाटील.

धरणगावात कापूस खरेदीस प्रारंभ ; शेतकर्‍यांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन

धरणगाव प्रतिनिधी ,धनराज पाटील:-. सरकार अडचणीत असूनही कापसाची शासकीय खरेदी सुरू असून एकही शेतकरी कापूस मोजणीपासून वंचित राहणार नसल्याची ग्वाही आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. ते धरणगाव येथे शासकीय कापूस खरेदीच्या शुभारंभाप्रसंगी बोलत होते.

धरणगाव येथील कृष्णा कॉटन व एस. के. कॉटन जिंनीग प्रेसिंग मिल मध्ये शासकीय कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी. जी. पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, राष्ट्रवादीचे नेते तथा पणनेचे संचालक संजय पवार, पंचायत सभापती मुकुंदराव नन्नवरे, जि. प. सदस्य गोपाल चौधरी, आशिष गुजराथी, शेतकी संघाचे अध्यक्ष पाटील, तहसीलदार देवरे, सहाय्यक उपनिबंधक बारी , गजानन पाटील, मच्छींद्र पाटील, माजी नगराध्यक्ष सुरेशनाना चौधरी, नगरसेवक पप्पू भावे, राजेंद्र महाजन, रमेश पाटील, जीवन बयास, प्रेमराज पाटील, भानु

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *