दिल्लीत महाराष्ट्र सदनाबाहेर झळकले ‘महाराष्ट्रात आणीबाणी 2.0’ चे पोस्टर्स !

दिल्लीत महाराष्ट्र सदनाबाहेर झळकले ‘महाराष्ट्रात आणीबाणी 2.0’ चे पोस्टर्स !

नविदिल्ली : सबला उत्कर्ष प्रतिनिधी :- अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी बुधवारी सकाळी त्यांच्या राहत्या घरातून अटक केली.यानंतर केंद्रातील भाजप नेत्यांकडून देखील ठाकरे सरकारवर टीका करण्यात येते.त्यातच आता दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर राज्यात आणीबाणी 2.0 अशा आशयाचे पोस्टर्स लागले. भाजपाचे नेते तेजिंदरपाल सिंह बग्गा यांनी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाबाहेर राज्यात आणीबाणी 2.0 असे पोस्टर लावले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा फोटो आहे.या पोस्टरवर, आणीबाणी 2.0 मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे,असं लिहीण्यात आले आहे. महाराष्ट्रातील भाजपाकडून ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडण्यात येत होतं.त्यातच आता दिल्लीतील भाजपाचे नेते तेजिंदरपाल सिंह बग्गा यांनी थेट महाराष्ट्र सदनाबाहेर पोस्टर लावत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *