तांडे वस्तींच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील – खासदार उन्मेश पाटील यांची बंजारा सरपंच संघटनेचे बैठकीत ग्वाही …

बंजारा सरपंच संघटनेचे स्नेहमिलन संपन्न – आजी माजी सरपचांची घेतली खासदारांनी ख्यालीखुशाली ..

चाळीसगाव : सबला उत्कर्ष प्रतिनिधी – तांडे वस्तींवरील बंजारा समाजाच्या विकासासाठी नेहमी प्रयत्नशील राहिलो आहे.शासनाच्या विविध योजनेचे विविध लाभ समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहचविला आहे. ग्राम पंचायत विभाजन, डोंगर रांगेतील गावाच्या पाणी पुरवठा योजना असो वा रस्त्यांची कामे, सरपंचाना सोबतीला घेऊन तालुक्यातील सर्वच तांडे वस्ती यांचा सर्वांगीण विकासाला चालना दिली. बंजारा समाजातील सरपंचांनी आज एकत्र येऊन गाव आणि समाज विकासाची कास धरली आहे. संघटनेने आपली वाटचाल सुरू ठेवावी मी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे असा विश्वास खासदार उन्मेश दादा पाटील यांनी दिला आहे.
आज बंजारा सरपंच संघटनेच्या वतीने खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या सोबत हितगुज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी खासदार उन्मेश दादा पाटील बोलत होते.
बंजारा सरपंच संघटनेच्या वतीने कोदगाव बायपास चौफुली जवळील फौजदार गार्डन येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष प्रा. सुनिल निकम, पंचायत समितीचे उपसभापती भाऊसाहेब पाटील ,सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र काका जैन, सरचिटणीस अमोल चव्हाण ,माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब राऊत,ज्येष्ठ कार्यकर्त्या नमोताई राठोड,सरपंच संघटनेचे अध्यक्ष साहेबराव राठोड ,लोणजे ग्रा प सदस्य अनिल चव्हाण याच्यासह तालुक्यातील ज्येष्ठ-श्रेष्ठ आजी माजी सरपंच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सांगवी सरपंच डॉ. महेंद्र राठोड, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सुनिल पवार, शिंदीचे माजी सरपंच गोरख राठोड, करगाव विकास सोसायटीचे चेअरमन दिनकर राठोड, चैतन्यतांडा सरपंच निलेश राठोड ,सरपंच संजय राठोड, वलठाण अनिल बाबुराव चव्हाण , वलठाण चे विनोद राठोड व विसापुर सरपंच समाधान राठोड ,पाणीपुरवठा अभियंता पाचोरा उपविभाग अनिल चव्हाण, घोडेगाव सरपंच अरुण राठोड ,चिंचगव्हाण सरपंच अरुण राठोड, तळेगाव सरपंच संतोष भाऊ राठोड, सेवानगर सरपंच डॉ. प्रकाश राठोड, ग्रामपंचायत सदस्य बळीराम चव्‍हाण, लोणजे सरपंच ताराचंद जाधव, दडपिंप्री सरपंच प्रकाश राठोड, विष्णू टेलर शिंदी , शिंदी सरपंच कैलास राठोड, जुनोने सरपंच विक्रांत राठोड ,सोसायटी संचालक चरणदास राठोड यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी नवनिर्वाचित व मावळते सरपंचाचा खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *