घाबरतात’असे म्हणत लोकांना पिस्तुल दाखवत धमकावत होता जळगावातला तरुण…

घाबरतात’असे म्हणत लोकांना पिस्तुल दाखवत धमकावत होता जळगावातला तरुण.


सबला उत्कर्ष प्रतिनिधी मयुर वाघुळदे :- जळगाव :- एका पोलिस कर्मचाऱ्यास लाचेच्या गुन्ह्यात अटक करुन दिल्यानंतर स्वत: गावठी पिस्तूल बाळगत पोलिस मला घाबरतात असे म्हणत चौकात गावठी पिस्तूल रोखून दहशत परसवणाऱ्या तरुणास एलसीबीच्या पथकाने बुधवारी अटक केली. नीतेश मिलिंद जाधव (वय २१, रा. पिंप्राळा स्मशानभूमीजवळ) असे संशयिताचे नाव आहे.
नीतेश जाधव बुधवारी ब्रेन हॉस्पीटलजवळ गावठी पिस्तूलने दहशत माजवत होता. ‘मी दादा आहे. पोलिसही मला घाबरतात’ असे म्हणत तो पिस्तूल रोखून दहशत पसरवत होता. ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यांनी संजय हिवरकर, राजेश मेंढे, रवी नरवाडे, अविनाश देवरे, प्रदीप पाटील, जयंत चौधरी, दत्तात्रय बडगुजर, महेश महाजन यांचे पथक घटनास्थळी पाठवले.

पथकाने नीतेश याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गावठी पिस्तूल जप्त केले. शस्त्र बाळगणे, दहशत परवण्याच्या कलमाखाली त्याच्या विरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *