खरजई नाका परीसरातील चौकास ‘संत संताजी जगनाडे महाराजांचे’ नाव देण्यात यावे; परीसरातील नागरीकांची मागणी…

खरजई नाका परीसरातील चौकास ‘संत संताजी जगनाडे महाराजांचे’ नाव देण्यात यावे; परीसरातील नागरीकांची मागणी

चाळीसगाव – सबला उत्कर्ष प्रतिनिधी :- चाळीसगाव शहराला अनेक संत विभूतींची परंपरा लाभली असून यात थोर संत तुकाराम महाराज आणि संत जगनाडे महाराजांचे गुरुशिष्याचे नाते सर्वश्रुत आहे. संत तुकाराम महाराजांची गाथा लिहिणारे थोर संत श्री संताजी जगनाडे महाराज यांचे कार्य समस्त समजासाठी नेहमीच आदर्शवत राहिले आहे. ही बाब लक्षात घेता शहरातील खरजई नाका परीसरातील चौकास श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या नावे ‘श्री संताजी कॉर्नर’ असे नामकरण करण्यात यावे या आशयाची मागणी परीसरातील नागरीकांच्या वतीने करण्यात आली असून या आशयाचे निवेदन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शंकर गोरे यांना यावेळी देण्यात आले.

यापूर्वी सन १९९८-९९ या कालावधीत तत्कालीन नगराध्यक्ष कै. अनिलदादा देशमुख, माजी नगराध्यक्ष कै. मधुकर चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत खरजई नाका परीसरातील चौकाचे ‘संताजी कॉर्नर’ या नावाने फलकाचे अनावरण करण्यात येवून नामकरण करण्यात आले होते. तरी सबब बाब अन नागरीकांची मागणी लक्षात घेता सदरहू चौकास संताजी जगनाडे महाराजांच्या नावे ‘श्री संताजी कॉर्नर’ असे नामकरण करण्यात यावे अशी मागणी परीसरातील नागरीकांनी निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी नगरसेवक सूर्यकांत ठाकूर, माजी नगरसेवक प्रदीप राजपूत, अनिल चौधरी (ठाकरे), अमोल चौधरी, स्वप्नील कोतकर, प्रकाश पाटील, योगेश चौधरी, सतीश चौधरी, चंद्रकांत महाजन, मनोज चौधरी आदी उपस्थित होते तर यशवंत चौधरी, संजय चौधरी, सुधीर चौधरी, वनेश खैरनार, प्रताप भोसले, दिपक सुर्यवंशी, सचिन देशमुख, उमेश आंधोळकर, गणेश चौधरी, प्रवीण चौधरी, चंद्रकांत चौधरी, निखिल देशमुख आदींच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *