गोगाबाबा टेकडी परिसरात वृक्षारोपण मोहीम राबविणार – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण…

गोगाबाबा टेकडी परिसरात वृक्षारोपण मोहीम राबविणार
– जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

औरंगाबाद: दि 26 ( सबला उत्कर्ष ) गोगाबाबा टेकडीच्या पायथ्यापासून ते माथ्यापर्यंत वृक्षारोपणाचे नियोजन करावे. वड, पिंपळ, चिंच असे झाडे लावून विशेष मोहीम हाती घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज सकाळी 6:30 वाजता गोगाबाबा टेकडी सर केली. यावेळी
मनपा अतिरीक्त आयुक्त बी बी नेमाने, रवींद्र निकम, घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख नंदकिशोर भोंबे, वन अधिकारी श्री काळे तसेच महसूल आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले की, गोगाबाबा टेकडी परिसरात वृक्षारोपण करण्यासाठी आराखडा तयार करून सूक्ष्म नियोजन करा. ह्या मोहिमेसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. गरज पडल्यास सीएसआर निधीमधून निधी देण्यात येईल. या टेकडीवर जलसंवर्धन कशाप्रकारे करता येईल याबाबतही संबंधित यंत्रणेला निर्देश दिले.
टेकडी सर करत असताना त्यांनी नागरिकांशी संवाद साधला आणि वृक्षारोपण मोहिमेचे महत्व पटवून दिले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *