तक्रारींचा निपटारा तत्काळ करा – डॉ.अनंत गव्हाणे

तक्रारींचा निपटारा तत्काळ करा
– डॉ.अनंत गव्हाणे

औरंगाबाद, दिनांक 28 ( सबला उत्कर्ष ): जिल्हा ग्राहक सरंक्षण परिषदेच्या समिती सदस्यांमार्फत दाखल करण्यात आलेल्या तक्रारींचा निपटारा तत्काळ करण्याच्या सूचना अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात आयोजित जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद, जिल्हा दक्षता आणि जिल्हा भाववाढ सनियंत्रण समितीच्या बैठकीत श्री. गव्हाणे बोलत होते. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी दत्ता भारस्कर, जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे, जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाचे बी.एस.देशमुख, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी एकनाथ बंगाळे, राजेश हापसे, डी.एम.दिवटे आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
श्री. गव्हाणे म्हणाले, वजन मापे विभागाने तपासणी मोहीम अधिक तीव्र करावी. तर जिल्हा पुरवठा विभागासह इतर विभागांनी दिव्यांगांना शिधापत्रिकाबाबत विचारणा करून त्यांना शिधापत्रिका प्राप्त करून देण्यासाठी सहाय्य करावे. ग्रामीण भागातील एकही दिव्यांग शिधापत्रिकेपासून वंचित राहणार नाही, यासाठी सर्वच विभागांनी पुढाकार घ्यावा. तसेच पैठण तालुक्यातील गावांमधील सेतू सुविधा केंद्र व महा इ सेवा केंद्रावर प्रमाणपत्र वेळेत व शासनाने ठरवून दिलेल्या शुल्कात देण्यात यावीत, यासाठी त्वरीत कार्यवाही करण्यात यावी. त्याचबरोबर श‍िधापत्रिकाधारकांना एकाच स्वस्त धान्य दुकानातून अन्न धान्याचे वितरण व्हावे, अन्यठिकाणच्या स्वस्त धान्य दुकानातून एकाच लाभार्थ्याला शिधा वितरीत होत असेल तर अशा स्वस्त धान्य दुकानांची तपासणी करण्याच्या सूचनाही श्री. गव्हाणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या. शेवटी श्री. भारस्कर यांनी सर्वांचे आभार मानले.


0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *