खासदार उन्मेश दादा पाटील यांनी धरणगाव कोविड सेंटर ग्रामीण रूग्णालयास दिली भेट : रुग्णांची घेतली भेट…

सबला उत्कर्ष,धरणगाव प्रतिनिधी:- ग्रामीण रुग्णालय इमारत जुनी झालेली आहे. त्यामूळे दीर्घकाळ व कायमस्वरूपीची आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी नवीन ग्रामीण रुग्णालय याचा प्रस्ताव सादर करून राष्ट्रीय आरोग्य अभियानातून निधी देण्यात यावा, जम्बो ऑक्सीजन व्यवस्था देण्यात यावी जेणेकरून ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही. तसेच केंद्रिकृत (सेंट्रलाईज ऑक्सिजन सिस्टम ) पद्धतीने व्यवस्था करण्यात यावी आणि तातडीने किमान दोन वेंटिलेटर उपलब्ध करून द्यावे. जेणेकरुन गंभीर रुग्णांना वेळेवर त्याचा लाभ घेता येईल. या उपाय योजना तातडीने करण्यात याव्यात. अशी मागणी यावेळी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
खासदार उन्मेश दादा पाटील यांनी धरणगाव कोविड सेंटर ग्रामीण रूग्णालयास भेट देत रुग्णांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली. यावेळी खासदार उन्मेश दादा पाटील बोलत होते. यावेळी तहसीलदार नितिन देवरे,वैद्यकीय अधिकारी डॉ. बन्सी यांनी तालुक्यातील एकूण परिस्थितीबाबत माहिती दिली. खासदार उन्मेशदादा पाटील यांनी सूचना देत कोवीड सेंटर मधील अडीअडचणी समजून घेत लागलीच. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित राऊत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.नागोजीराव चव्हाण, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. रामानंद सागर यांचेशी तातडीने संपर्क साधत कोविड सेंटरमध्ये रुग्णांना अधिक प्रभावी वैद्यकीय सेवा पुरवावी अशी मागणी केली. याप्रसंगी धरणगाव शहराध्यक्ष दिलीप महाजन, भाजप जिल्हा सरचिटणीस सचिन पानपाटील, पालिकेतील गटनेते कैलास माळी, नगरसेवक तथा तालुका सरचिटणीस ललित येवले,नगरसेवक भालचंद्र माळी, नगरसेवक शरद आण्णा कंखरे,शहर सचिव कन्हैय्या रायपूरकर, सोसायटी संचालक राजेंद्र महाजन, शेतकरी आघाडी अध्यक्ष वासुदेव महाजन, टोनी महाजन, जुलाल भोई, युवा मोर्चा अध्यक्ष भूषण कंखरे,
माजी सरपंच रवीआबा जामदेकर, सामाजिक कार्यकर्ते शेषराव चव्हाण, प्रवीण महाजन, सुनील चौधरी आदि मान्यवर उपस्थित होते.

ग्रामीण रुग्णालयाची पाहणी

खासदार उन्मेशदादा पाटील यांनी संपूर्ण ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करून काय कमतरता आहे याची माहिती तहसीलदार नितिन देवरे,डॉ.बन्सी,डॉ.शाह व कर्मचारी यांच्याशी चर्चा करून घेतली, रेमडीसीव्हर इंजेक्शन व इतर औषधी नसल्यास तातडीने संपर्क करावा. असे सांगत जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांच्याशी फोनवर चर्चा करत लवकरात लवकर येथील ग्रामीण रुग्णालय कोवीड सेंटर मध्ये केंद्रीकृत ऑक्सिजन व्यवस्था सूरू करा. ड्युरा सिलेंडर व जम्बो सिलेंडर तात्काळ पाठवावे जेणे करून ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णाचा जीव जाणार नाही त्याच बरोबर दोन व्हेंटिलेटर तात्काळ उपलब्ध करून तात्पुरता स्वरूपात एम. डी. डॉक्टर यांची नियुक्त करुन अधिकचा कर्मचारी वर्ग उपलब्ध करावा. असे शासनाने आदेश करावेत.
केंद्र शासनाचा निधी पडून आहे आपण नवीन ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन वास्तूसाठी निविदा तयार करून टेंडर काढावे मी सहकार्य करायला तयार आहे. भडगाव, पारोळा येथे एक ते दीड वर्षात नवीन प्रशस्त रुग्णालय इमारत उभ्या झाल्या आहेत. धरणगावात देखील नवीन वास्तू उभी राहावी यासाठी माझा सर्वोतोपरी प्रयत्न राहील. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी सर्व कोरोना पॉंझिटीव्ह रुग्णांशी उन्मेशदादा पाटील यांनी तब्येतीविषयी आस्थेवाईकपणे केली विचारपूस करीत त्यांना धीर दिला.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *