रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उपलब्ध समन्वयासाठी अन्न व औषध प्रशासन पथक सज्ज – सहायक आयुक्त राठोड…

रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उपलब्ध समन्वयासाठी अन्न व औषध प्रशासन पथक सज्ज – सहायक आयुक्त राठोड.

【खासदार चिखलीकर यांनी सहायक आयुक्त राठोड यांना कडक बोल सुनावले!】

नांदेड/गजानन जोशी ( सबला उत्कर्ष न्यूज )

नांदेड – जिल्ह्यात जानेवारीपासून कोविड बाधितांची संख्या मोठया प्रमाणात वाढत गेल्याने यातील गंभीर आजारी असलेल्या रुग्णांना द्याव्या लागणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उपलब्धतेबाबत नांदेड शहरातील चाळीस औषध विक्रेत्यांची यादी अन्न व औषध प्रशासन विभागाच्यावतीने जाहिर करण्यात आली.

सद्यस्थितीत सिप्रिमी,जुबी-आर, रेमेबीन, डेसरेन, कोविफॉर, रॅमडॅक, सिपला, जुबीलियंट, सनफार्मा, मायलॉन, हेट्रोड्रग्स, झायडस कॅडीला या नावाने रेमडेसिवीर युक्त औषधे उपलब्ध आहेत. प्रत्येक औषधाच्या किंमती वेगवेगळया आहेत. यावर नमूद औषधाच्या किंमती (एमआरपी) कंपन्यानुसार जरी वेगवेगळया असल्या तरी त्या रास्त दरात रुग्णांसाठी उपलब्ध करुन द्याव्यात असे निर्देश अन्न व औषध प्रशासनाने औषध विक्रेत्यांना दिलेले आहेत. याचबरोबर या इंजेक्शनच्या कंपनीनिहाय किंमती दर फलकावर त्यांच्या मेडीकल स्टोअरच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. या औषधाची विक्री करताना औषध विक्रेत्यांनी डॉक्टरांचे मूळ प्रिस्क्रीप्शन, रुग्णांचा कोविड पॉझिटिव्ह रिपोर्ट, सिटीस्कॅन रिपोर्ट, रुग्णांचे आधारकार्ड यांच्या प्रती घेवूनच औषधाची विक्री करावी असेही स्पष्ट केले आहे.  

डॉक्टरांनी हे इंजेक्शन सूचविताना प्रिस्क्रीप्शनवर आपले नाव, शिक्षण , रजिस्ट्रेशन क्रमांक, स्वाक्षरी, रुग्णांचे नाव व तो कोविड पॉझिटिव्ह असल्याचा स्पष्ट अभिप्राय देण्यासाठीही निर्देश केले आहेत. कोविड रुग्णांची संख्या वाढल्याने स्वाभाविकच यातील गंभीर रुग्णांसाठी या इंजेक्शनची मागणी वाढली आहे. यात दिलेल्या निर्देशाप्रमाणे नांदेड येथील कोविड रुग्णालय व त्यांच्याशी संलग्न असलेल्या औषध विक्रेत्याकडून यांची विक्री दिलेल्या दरात व गरजेप्रमाणे होते किंवा नाही हे तपासण्यासाठी तीन समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. शासनातर्फे या इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी सर्व स्तरावरुन निर्देश दिले असून योग्य तो समन्वय साधला जात असल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त (औषधे) रोहीत राठोड यांनी सांगितले.

कोविड रुग्णांचा उपचार हे शासनाने परवानगी दिलेल्या रुग्णालयाची यादी लक्षात घेवून ज्यांना इंजेक्शनची अत्यावश्यकता आहे अशाच रुग्णांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली रेमडेसिवीअर हे इंजेक्शन घेणे गरजेचे आहे. गरज नसताना केवळ अहवाल पॉझिटिव्ह आला म्हणून हे इंजेक्शन शासनाने मान्यता न दिलेले डॉक्टर सुचवत असल्याने बाजारात मागणी वाढल्याचे दिसत आहे.

एखादे व्यावसायिक या इंजेक्शनसाठी जास्त किंमतीने दर आकारत असेल तर त्याबाबत अन्न व औषध प्रशासन कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन सहायक आयुक्त यांनी केले आहे.  याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून नांदेड जिल्ह्यातील जनतेला या समन्वय अधिकाऱ्यामध्ये सु.द. जिंतूरकर – 7588794495, मा.ज.निमसे-9423749612, र.रा. कावळे-9923630685 यांचा समावेश आहे…

# खासदार चिखलीकर यांनी (दि.०६ एप्रिल) रोजी सहायक आयुक्त यांना खडसावल्यानंतर ही पथक तैनात झाली असावीत,सत्यपरिस्थितीवर लोकप्रतिनिधी यांनी आक्षेप घेतल्यानंतर काय होऊ शकते,हे चिखलीकर यांच्या या दूरध्वनीवरील संभाषणामुळे समोर आले…

# मागील 2 आठवड्यांपासून चालू असलेला काळा बाजार यासाठी कोण जवाबदार आहे?

या पथकातील जिंतूरकर यांचा फोन बंद,निमसे व्यस्त असतात,कावळे फोन घेत नाहीत,असे जर विना सहकार्य (समन्वयाचे) पथक तयार होणे,म्हणजे पांढरे कागद काळे करणे म्हणावे का? अशी नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहे….

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *