कोरोना योध्यांच्या बळावरच आज समाज सुरक्षित – खासदार उन्मेश दादा पाटील यांचे प्रतिपादन …

खासदार उन्मेश पाटील यांच्या उपस्थितीत पाचोरा येथील लालबाग चा राजा गणेश मंडळ चॅरिटेबल ट्रस्ट व सुशील इंटरप्राईजेस पाचोरा आयोजित सन्मान कोरोना योध्यांचा कार्यक्रम.

पाचोरा – सबला उत्कर्ष ( संजय चौधरी जळगाव ग्रामीण रिपोर्ट ) -कोरोना आजाराने आपले कोण परके कोण हे सिद्ध करण्याची वेळ आणली. असे असताना काही घटकांनी आपल्या जीवांची पर्वा न करता आपली समाजसेवेची तळमळ सुरूच ठेवली. कोरोना रुग्णास औषधोपचार सोबत मानसिक बळ देणे गरजेचे होते. ते देण्याचे काम आजच्या कोरोना योध्यांनी केले आहे. माणुसकीच्या पलिकडे जाऊन केलेली रूग्ण सेवेने मन जोडली गेली. या कोरोना
योध्यांच्या बळावरच आज समाज सुरक्षित आहे. त्यामुळे यांच्या चांगल्या कामाचे कौतुक होणे आवश्यक असून त्यातून इतरांना प्रेरणा मिळते अशी भावना खासदार उन्मेश दादा पाटील यांनी व्यक्त केली आहे. यावेळी खासदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, पोलीस उपविभागीय अधिकारी ईश्वर कातकडे ,तहसीलदार कैलास चावरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.समाधान वाघ
यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष अमोल दादा शिंदे ,पोलीस निरीक्षक अनिल शिंदे ,भाजपा शहराध्यक्ष रमेश वाणी ,व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष जगदीश पटवारी ,उपप्राचार्य प्रा. शिवाजी पाटील ,ज्येष्ठ नेते भाजप व्यापारी आघाडीचे कांतीलाल जैन, नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले ,गणेश मंडळाचे अध्यक्ष राहुल जैन, नायब तहसीलदार अमित भोईटे ,रोटरीचे माजी अध्यक्ष रोहन पाटील तसेच पत्रकार , कोरोना योद्धे व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *