केळी उत्पादकांचा ९ रोजी जळगावात मोर्चा : खासदार उन्मेश पाटील यांची माहिती…

केळी उत्पादकांचा ९ रोजी जळगावात मोर्चा : खासदार उन्मेश पाटील यांची माहिती…

चाळीसगाव : मयूर वागूळदे ( सबला उत्कर्ष ) :- केळी उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा येथील चौधरी मंगल कार्यालयात खासदार उन्मेष पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच पार पडला.
राज्य शासन केळी पीक विम्याविषयी शेतकऱ्यांची अवहेलना करत आहे. राज्य शासन इतर शेत पिकांना वेगळा न्याय व केळीला दुजाभाव करून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे.
ह्या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी ९ नोव्हेंबर सोमवारी जिल्ह्यातील सर्व केळी उत्पादक शेतकऱ्यांसोबत जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती खासदार पाटील यांनी दिली. या शेतकरी मोर्चात मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांनी हजर रहावे, असे आवाहन त्यांनी केले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *