कानळद्यात आईसह मुलाला बेदम मारहाण ; चार जणांविरोधात गुन्हा…

कानळद्यात आईसह मुलाला बेदम मारहाण ; चार जणांविरोधात गुन्हा.

जळगाव : मयूर वागूळदे ( सबला उत्कर्ष ) :- किरकोळ कारणावरुन मुलासह आईला चार जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना तालुक्यातील कानळदा येथे शुक्रवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

रजिया मजीद पिंजारी (वय ४५ रा.कानळदा) ही महिला मुलगा फारुखसह कानळदा येथे राहाते. शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता संशयित रवींद्र पुरुषोत्तम उर्फ लिलाधर सपकाळे याला रागाने का पाहातो असा जाब फारुखने विचारला. त्याचा राग आल्याने रवींद्रसह पुरुषोत्तम बुधो सपकाळे, अंजनाबाई पुरुषोत्तम सपकाळे व नरेंद्र सपकाळे (सर्व रा.कानळदा) यांनी लोखंडी सळई फारुखच्या डोक्यात मारली. त्यामध्ये त्याला जबर दुखापत झाली. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या रजीया यांनाही चौघांनी मारहाण केली.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *