कारच्या बोनट मधुन दारूची तस्करी नंदुरबार एलसीबीची कारवाई तीन लाखांचा मुद्देमाल जप्त…

नंदुरबार शहरातुन तळोदा रस्त्याने नळवा गावाकडून मारुती सेलेरीओ कारमधुन दारुचीअवैध तस्तरी केली जात आहे.

नंदुरबार शहरातुन तळोदा रस्त्याने नळवा गावाकडून मारुती सेलेरीओ कारमधुन दारुची
सबला उत्कर्ष – सतिष तायडे : अवैध तस्तरी केली जात आहे.अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने मा.पोलीस अधीक्षक, श्री. महेंद्र पंड‍ित ,अपर पोलीस
अधीक्षक श्री. विजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक 5/12/2020 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे
पोलीस निरीक्षक श्री. विजयसिंह राजपुत, पोहेकॉ मुकेश तावडे, पोना मनोज नाईक, पोना जितेंद्र ठाकुर यांचे
पथकाने तळोदा रस्त्यावरील हॉटेल साई गार्डन जवळील नळवा गावाकडे जाणार्‍या रस्‍त्यावर सापळा लावला.
दुपारी 13.00 वाजेचे सुमारास एक पांढर्‍या रंगाची मारुती सेलेरीओ कार संशयास्पदरित्या येत
असल्याची दिसल्याने गाडी थांबवून विचारपुस केली असता चालकांनी उडवाउडवीसुरु केली. गाडीची कसुन
तपासणी केली असता गाडचे बोनेटमध्ये, दरवाज्याचे कव्हरमध्ये 28 हजार रुपये किंमतीच्या विदेशी दारुच्या
190 बाटल्या लपवुन अवैधरित्या वाहतुक करण्याच्या उद्देशाने शिताफिने लपविला असल्याचे दिसुन आले.
घनशामभई खेनी रा. सुरत याचे विरुध्द उपनगर पोलीस ठाण्यात दारुबंदी कायदृयान्वये अवैध दारु
वाहतुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक ,नंदुरबार, श्री. महेंद्र पंडीत साो. अपर अपर पोलीस
अधीक्षक विजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वे. शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विजयसिंह
राजपुत, पोहेकॉ मुकेश तावडे, पोना मनोज नाईक, पोना जितेंद्र ठाकुर यांचे पथकाने केली आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *