दुकान फोडून मोबाईल चोरणारा 24 तासात गजाआड; नंदुरबार एलसीबीची कामगिरी…

दुकान फोडून मोबाईल चोरणारा 24 तासात गजाआड; नंदुरबार एलसीबीची कामगिरी.

नंदुरबार – दुकानाचे शटर उचकटून सुमारे अडीच लाखाचे मोबाईल लंपास करणाऱ्या आरोपीला अवघ्या 24 तासात शहर पोलिसांनी अटक केली.

नंदुरबार – सबला उत्कर्ष ( सतिष तायडे ) :- दुकानाचे शटर उचकटून सुमारे अडीच लाखाचे मोबाईल लंपास करणाऱ्या आरोपीला अवघ्या 24 तासात शहर पोलिसांनी अटक केली. दरम्यान घरफोडी करणाऱ्यांनी दागिने, रोख रक्कमेसाठी घरात चोऱ्या करण्या ऐवजी दुकाने, कार्यालये यांना लक्ष बनवून किमती वस्तूंवर हात मारणे सुरु केल्याचे दिसून आले आहे.
नंदुरबार शहरातील कल्पना कॉम्प्लेक्समधील शंकर मंदाणा यांचे मोबाईल विक्रीचे आणि दुरुस्तीचे दुकान आहे. या दुकानातून 3 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजेपासून 4 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोराने शटर उचकटून जुने व नवे 37 मोबाईल लांबवले, अशी फिर्याद मंदाणा यांनी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात काल 4 डिसेंबर रोजी दिली होती. फिर्याद दाखल करून घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंपी यांनी तपास चक्रे फिरवली. स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने काही तासातच नंदुरबार शहरातील गोपी भरवाड या 21 वर्षीय तरुणाला अटक केली. त्याने गुन्हा कबूल करून त्याच्याकडील काही मोबाईल पोलिसांना दिले. दरम्यान नंदुरबार शहरात व जिल्ह्यात घरफोडीचे प्रमाण वाढले आहे. तीन दिवसापूर्वी नवापुर तालुक्यातील खांडबारा येथे वीज मंडळाच्या कार्यालयातून अडीच लाख रुपये किमतीचे 251 वीज मीटर चोरून नेल्याची फिर्याद दाखल झाली आहे. दोन दिवसापूर्वी नवापुर तालुक्यातील शाळेच्या डिजिटल वर्गातून पावणेदोन लाखाचे साहित्य चोरीस गेल्याची घटना घडली आहे. मोटरसायकल चोरीचे प्रमाण सुद्धा अचानक वाढले आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *