अखिल भारतीय विद्यार्थी परिषद धरणगाव शाखेच्या वतीने स्मरणशक्ती तंत्रज्ञान आणि वैदिक गणित या विषयावर सेमिनार संपन्न…


धरणगाव प्रतिनिधी,धनराज पाटील :- सबला उत्कर्ष : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नेहमीच विद्यार्थी शिक्षित संस्कृतीत व्हावा यासाठी प्रयत्न करत असते. हे उद्दिष्ट ठेवून अभाविप धरणगाव शाखेच्या वतीने औरंगाबाद (संभाजीनगर) येथील श्री. राजेश कदम सर ( रामकृष्ण मिशन )यांचे स्मरणशक्ती तंत्रज्ञान आणि वैद्यक गणित या विषयावर सेमिनार घेण्यात आले. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चे सर्व नियम पाळून सोशल डिस्टन्स, सॅनिटाइजर व मास्क लावून कार्यक्रम संपन्न झाला.या सेमिनारला अध्यक्ष म्हणून अभाविप जळगाव महानगराध्यक्ष प्रा. भूषण राजपूत सर हे उपस्थित होते. तसेच प्रमुख अतिथी म्हणून प्रा.आर.एन. महाजन सर यांचे मार्गदर्शन लाभले. धरणगाव शहरातील प्रतिष्ठीत नागरिक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येत या सेमिनारला उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. राजपूत सर यांनी अभाविप परिचय व कार्यपद्धती मांडली. तसेच श्री. आर. एन. महाजन सरांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. बालकवी ठोंबरे व सा. दा. कुडे विद्यालयातील उपशिक्षक कैलास माळी सर यांनी सेमिनारला उपस्थित सगळ्या विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची पुस्तके भेट स्वरुपात दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. कुंदबाला नरेंद्र पाटील हिने तर, आभार प्रदर्शन शहर मंत्री इच्छेश काबरा यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्यक्रम प्रमुख रोहित पाटील, हरिष महाजन,जिगर सुर्यवंशी, सागर महाजन, सुमित सोनार, विरार चौधरी, मोरेश्वर महाले, योगेश पाटील, ज्ञानेश्वर महाजन, अनुज महाजन, आदित्य नायार, कल्पेश पाटील या सर्वांनी यशस्वी प्रयत्न केले.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *