छ.शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज खा.छ. उदयनराजे भोसले आणि खा.उन्मेश पाटील यांची महत्वकांशी भेट.

सातारा – सबला उत्कर्ष :- पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवार संग्राम संपतराव देशमुख यांच्या प्रचारार्थ सातारा दौर्‍यावर असलेले खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची भेट घेतली.यावेळी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी तरुण-तडफदार खासदार उन्मेश दादा पाटील यांचे अभिनंदन करीत जळगाव लोकसभा मतदारसंघाबद्दल माहिती जाणून घेतली. यावेळी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी चाळीसगाव शहरात प्रस्तावित असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा व शिवसृष्टी बाबत खासदार उदयनराजे भोसले यांना माहिती दिली.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *