श्री विश्वास पाटील API चिकलठाणा यांना सामाजिक क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार जाहीर…

श्री विश्वास पाटील API चिकलठाणा यांना सामाजिक क्षेत्रातील सेवा गौरव पुरस्कार जाहीर

औरंगाबाद : सबला उत्कर्ष प्रतिनिधी :- सु-लक्ष्मी बहुद्देशिय सेवाभावी संस्था औरंगाबाद व माणुसकी रुग्णसेवा समुह शासकीय रुग्णालय घाटी यांच्या संयुक्त विद्यमाने चौथ्या वर्धापन दिनानिमित्त API विश्वास पाटील यांना सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.हा पुरस्कार सोहळा दि. ३०-१२-२०२० बुधवार रोजी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा मौलाना आझाद संशोधन केंद्र, टीव्ही सेंटर औरंगाबाद येथे संपन्न होणार आहे.माणुसकी चा चौथा वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाची रूपरेषा- दुपारी १०:०० वाजता महारक्तदान शिबीर शासकीय रत्त पेढि साठि- ०१:०० वा. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ४१ व्यक्तीचां गुण गौरव या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. त्यापैकी विश्वास पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक चिकलठाणा पोलीस स्टेशन औरंगाबाद ग्रामीण विभाग.१९९१ साली महाराष्ट्र पोलीस दलात त्यांची निवड झाली.त्यांचे शिक्षण B. Com पर्यंत ssvps कॉलेज धुळे येथून झालेले असून त्यांचे मूळगाव हडसुने तालुका,जिल्हा धुळे हे आहे .पोलीस दलात त्यांनी आतापर्यंत.नाशिक,औरंगाबादशहर, वाशीम,औरंगाबाद ग्रामीण या जिल्ह्यांमध्ये नोकरी केलेली आहे.औरंगाबाद मध्ये ते जुन २०११ पासून कार्यरत औरंगाबाद मद्ये कार्यरत आहेत औरंगाबाद ग्रा मद्ये त्यांनी सिल्लोड ग्रामीण, विरगाव व सद्या चिकलठाणा या पोलिस स्टेशनला प्रभारी अधिकारी म्हणून काम केलेले आहे.
समाजातील सर्व घटक जाती, धर्म, पक्ष ,संघटना यांचे सोबत सलोख्याचे संबंध प्रस्थापित केले.
पोलीस दलातील एक स्वच्छ प्रतिमा असणारा व गुन्हेगारांवर कठोर कारवाई करणारे अधिकारी म्हणून ते ओळखले जातात .सर्व सामाजिक संघटनांना त्यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य नेहमीच असते. समाजाचे काही देने लागते म्हणून शाळा, कॉलेज, क्लासेस मधील विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन ते करतात.विरगाव येथे लॉक डाउन काळात एक कामगार जोडपे गरोदर कळा येताय मो सा वरून दवाखान्यात जात असताना रात्री 10 वा ती महिला रोडवरच प्रसूत झाली असता तात्काळ महिला बोलावून तिची प्रसूती केली व तात्काळ खाजगी गाडी करून सोबत दवाखान्या साठी खर्चायला पैसे दिले व वैजापूर ला पाठवले होते.अश्या या पोलीस खात्यातील आदर्श API विश्वास पाटील सरांना माणुसकी समुहाचा सेवा गौरव पुरस्कार निवड झाल्या बाबत पत्राद्वारे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक सुमित पंडित यानी कळविले आहे.ह्या पुरस्काराबद्दल समाजामध्ये API विश्वास पाटील सरांचे सर्वेत्र कौतुक केले जात आहे….

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *