महात्मा गांधी” दर्शन पुरस्कार मुंबई येथे मोठ्या थाटामाटात संपन्न…

समाजसेवक सुमित पंडित व गजानन क्षीरसागर यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान पत्र ट्रॉफी व सुवर्णपदक प्रदान

औरंगाबाद : सबला उत्कर्ष ब्युरो – आनंदश्री ऑर्गनायजेशन संस्थे मार्फत आयोजित कार्यक्रमात समाजसेवक सुमित पंडित व गजानन क्षिरसागर सामाजिक, मानव अधीकार क्षेत्रात आम्ही केलेल्या उल्लेखनीय कार्या बद्दल आम्हास महात्मा गांधी दर्शन पुरस्कार 2020 देऊन गुणगैरव करण्यात आले.राज्यस्तरीय व राष्ट सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या औरंगाबाद येथील समाजसेवक सुमित पंडित व जळगावचे गजानन क्षिरसागर यांना महात्मा गांधी दर्शन पुरस्कार प्रदान करन्यात आला आहे.यात कला, क्रीडा,साहित्य, शैक्षणिक, सामाजिक,अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.ह्या पुरस्काराचे स्वरूप शाल श्रीफळ व आकर्षक प्रमाणपत्र व गांधी सन्मानचिन्ह ( महात्मा गांधी 4″ COIN ) देऊन गौरवण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटक:पद्मश्री डाॅक्टर विजय शाह( गांधीवादी )श्री. लक्ष्मण गोले( गांधी विचारवादी )श्रीमती डाॅक्टर संगीता गिरीश नाईक
( गांधी विचारवादी )श्री. सुदर्शन सबत
( मास्टर माईन्ड ट्रेनर )चेतन पाटील माणुसकी समुहाचे जळगाव जील्हा उपाध्यक्ष आदि मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली.सागर इन्ट्रानॅशनल हाॅटेल,
सरिता हाॅल, कल्याण स्टेशन जवळ, कल्याण ( प ) महाराष्ट्र. येथे, हा पुरस्कार सोहळा दि. 10/12/2020 रोजी मुंबई येथे सांय 3.30 वा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. सुमित पंडित यांचा हा 56 वा पुरस्कार होता याआधी त्याना महाराष्ट्र विविध 55 पुरस्काराने सन्मानित करन्यात आले आहे या पुरस्कारामुळे संपूर्ण महाराष्ट्रात गजानन व सुमित त्यांचे कौतुक होत आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *