दिल्लीत अलर्ट ! ट्रॅक्टर रॅलीत पाकिस्तानचा घातपाताचा कट; तब्बल 308 ट्विटर हॅण्डल सक्रीय…


दिल्लीत अलर्ट ! ट्रॅक्टर रॅलीत पाकिस्तानचा घातपाताचा कट; तब्बल 308 ट्विटर हॅण्डल सक्रीय.

नवी दिल्ली : सबला उत्कर्ष ब्युरो – दिल्लीत शेतकऱयांच्या ट्रक्टर रॅलीत घातपात घडवण्याचा पाकिस्तानचा कट असून यासाठी तेथे तब्बल 308 ट्विटर हॅण्डल सक्रीय आहेत. दिल्ली पोलिसांनी रविवारी हा मोठा खुलासा केला. गुप्तचर यंत्रणांकडून पाकिस्तानच्या कटकारस्थानांची माहिती मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस अॅलर्ट झाले आहेत.

ट्रक्टर रॅलीला कडेकोट सुरक्षा पुरवली जाणार आहे. ट्रॅक्टर मोर्चाबद्दल माहिती देताना विशेष पोलीस आयुक्त (गुप्तचर यंत्रणा) दीपेंद्र पाठक यांनी प्रजासत्ताक दिनाचे सेलिब्रेशन संपल्यानंतर कडक सुरक्षेत ट्रॅक्टर मोर्चा काढला जाईल असे सांगितले आहे.

“पाकिस्तानमधील दहशतवादी काहीतरी मोठी समस्या निर्माण करु शकतात असा धोका आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पाकिस्तानमधील ३०८ ट्विटर हॅण्डल्स Farmer Protest, Tractor Rally संबंधित हॅशटॅगचा सतत वापर करत आहेत,” असे त्यांनी सांगितले आहे.

नोव्हेंबर महिन्यापासून शेतकरी दिल्लीच्या वेशीवर नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. यामध्ये खासकरुन पंजाब आणि हरियाणाचे शेतकरी आहेत. कायदे रद्द केले जावे ही शेतकऱ्यांची मुख्य मागणी असून यावर ते ठाम आहेत. दिल्ली पोलिसांनी शेतकऱ्यांना ट्रॅक्टर मोर्चा काढला जाऊ नये अशी विनंती केली असताना शेतकरी मात्र मोर्चा काढण्यावर ठाम आहेत.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *