जगभरात नावाजलेली जैन समुहात महिला व पुरुष कामगारांना गेल्या दोन ते तीन महिन्यापासून पगार देण्यास टाळाटाळ तरीही याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का…?


जळगांव : सबला उत्कर्ष प्रतिनिधी :
जळगाव ते शिरसोली व जळगाव ते पा पालधी रस्त्याला लागून जैन इरिगेशन व जैन व्हॅली कंपनी आहेत तरी या ठिकाणी महिला तसेच पुरुष कामगार काम करतात तसेच सद्या इकडे कोरोना महामारी चालू असून त्यात जैन समूह कडून गेल्या दोन ते तीन महिन्यापासून पगार देण्यास टाळाटाळ होत आहे.

तरी या कंपनीच्या भोंगळ कारभार सुरू आहे. कंपनीत ग्रामीण भागातील महिला व पुरुष कामगार आहेत. तरी जैन एरिगेशन व व्हॅली कंपनीत महिला व पुरुष कॉन्ट्रॅक्टदार, ठेकेदार तर्फे चालवले जातात. यांच्याकडे शिरसोली येथील महिला व पुरुष कामगार कामाला आहेत तसेच जळगाव मधील ग्रामीण भागातील कामगार काम करतात. त्यात जून व जुलै महिन्याचे पगार महिला कामगारांना मिळाला न होता याबाबत आमचे प्रतिनिधींनी इरिगेशन कंपनीचे ऑफिस येथे गेले असताना , तेथील इंगळे साहेब यांना विचारले की महिला तसेच पुरुष कामगारांना गेल्या दोन ते तीन महिन्यापासून पगार देण्यात विलंब का झाला ? तरी त्यांनी माहिती देण्यास नकार दिला .

जैन समूह…


तरी जैन समूहाचा भोंगळ कारभार सुरू असल्याने. तरी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी याची दखल घ्यावी. अशी माहिती जैन समुहात काम करणारे कर्मचाऱ्यांनी सबला उत्कर्ष चे प्रतिनिधी चा मद्येमातून तुमच्या पर्यंत पोहोचवली असे गृहीत होते…

जैन समूह जळगाव…
0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *