प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह अंतर्गत, खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नाने रावेर येथे दिव्यांग बांधवांसाठी “कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप”

*प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह अंतर्गत, खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नाने रावेर येथे दिव्यांग बांधवांसाठी “कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप” … सबला उत्कर्ष समाचार प्रतिनिधी राजेश सोनार

शिबिराचे आयोजन…*माननीय *प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदीजी* यांच्या वाढदिवसानिमित्त *सेवा सप्ताह* अंतर्गत *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे* यांच्या प्रयत्नाने केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग द्वारा *भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम, कानपूर (ALIMCO)* यांच्या मार्फत दिव्यांग बांधवांसाठी *“कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप”* शिबिराचे *रावेर* येथील व्ही.एस.नाईक महाविद्यालय येथे आयोजन करण्यात आले.मागील काही महिन्यापूर्वी *रावेर लोकसभा* क्षेत्रातील सर्व तालुका स्तरावर *खासदार श्रीमती रक्षाताई खडसे* यांच्या प्रयत्नाने *“मोफत पूर्वतपासणी व नोंदणी शिबीर”* चे आयोजन करण्यात आले होते, आता पूर्वतपासणी व नोंदणी झालेल्या दिव्यांग बांधवांना संबंधित *“कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने”* वाटप करण्यात येणार असून, आज *ग्रामविकास मंत्री श्री.गिरीषजी महाजन* यांच्या प्रमुख उपस्थितीत *रावेर* तालुक्यापासून शिबिराचा शुभारंभ करण्यात झाला, त्यानंतर रावेर लोकसभा क्षेत्रातील इतर तालुक्यावर शिबिरामार्फत पूर्वतपासणी व नोंदणी झालेल्या दिव्यांग बांधवांना संबंधित साहित्य वाटप करण्यात येणार आहे

.यावेळी *ग्रामविकास मंत्री श्री.गिरीषजी महाजन व खासदार श्रीमती रक्षाताई खडसे* यांच्यासह जिल्हाधिकारी श्री.आयुष प्रसाद, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.अमोल जावळे, आमदार श्री.संजय सावकारे, श्री.सुरेश धनके, लोकसभा निवडणूक प्रमुख श्री.नंदकिशोर महाजन, श्री.अजय भोळे, माजी जि.प.अध्यक्षा सौ.रंजना पाटील, श्री.सुनिल पाटील, जिल्हा उपाध्यक्ष श्री.प्रल्हाद पाटील, श्री.पदमाकर महाजन, भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, आमदार श्री.शिरीष चौधरी, श्री.अशोक कांडेलकर, श्री. भरत महाजन, श्री.विलास पाटील, श्री.नारायण चौधरी, श्री.राकेश पाटील, श्री.राजन लासूरकर, सौ.रेखा बोंडे, उपविभागीय अधिकारी श्री.कडलग, तहसीलदार श्री.कापसे, ई. सह लोकसभा क्षेत्रातील भाजपा, भाजयुमो तालुकाध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी व दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *