मेरी मिट्टी मेरा देश अभियानाअंतर्गत धुळे शहरात अमृत कलशाची स्थापना आणि मिरवणूक

मेरी मिट्टी मेरा देश अभियानाअंतर्गत धुळे शहरात अमृत कलशाची स्थापना आणि मिरवणूक… सबला उत्कर्ष समाचार प्रतिनिधी धुळे राजेश…..

*श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्थेचे, भाऊसाहेब ना.स.पाटील साहित्य आणि मु. फि.मु.अ. वाणिज्य महाविद्यालय धुळे येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दिनांक 23/09/2023 रोजी सकाळी ठीक 9.00 वाजता राष्ट्रीय सेवा योजना दिवस आणि मेरी मिट्टी मेरा देश अभियानांतर्गत अमृत कलश स्थापना आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी शहीद वीरांच्या अभिवादनासाठी एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयातील सेमिनार हॉल येथे झाले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर पाटील तर उद्घाटक धुळे जिल्ह्याचे युवा अधिकारी अशोकजी मेघवाल हे होते. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विभागीय समन्वयक डॉ. हेमंत जोशी आणि डॉ. सुनील पाटील यांच्याबरोबरच राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. निलेश पाटील महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. कल्पना पाटील आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सर्व स्वयंसेवक उपस्थित होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आयुष्यभर राबवणाऱ्या स्वातंत्र्यवीरांना दिलेली मानवंदना म्हणजेच येथील मातीचा गौरव हा गौरव मेरी मिट्टी मेरा देश या केंद्र शासनाच्या अभियानाद्वारे देशभरात साजरा करण्यात येत आहे. याप्रसंगी महाविद्यालयात एका अमृत कलशाची स्थापना करण्यात आली. महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विविध गावांमधील विद्यार्थ्यांनी सोबत आणलेली माती या कलशामध्ये संकलित करण्यात आली. या कलशाच्या मातीचा वापर करून महाविद्यालयात 75 रोपांची रोपवाटिका तयार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मातृहृदयी साने गुरुजी यांचे प्रतिमा पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. निलेश पाटील यांनी महाविद्यालयाच्या वतीने सेवा योजना विभागातील विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी आयोजित विविध उपक्रमांची माहिती दिली. राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास यांचा अभिन्न संबंध असल्याचे त्यांनी सांगितले.यानंतर केंद्रशासनाद्वारे आयोजित मेरी मिट्टी मेरा देश या अभियानाबद्दल माहिती जिल्हा युवा अधिकारी अशोकजी मेघवाल यांनी विद्यार्थ्यांना दिली. राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विभागीय समन्वयक डॉ. हेमंत जोशी यांनी राष्ट्रीय सेवा योजनेची मूलतत्वे सांगितली. डॉ. सुनील पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या विद्यार्थ्यांच्या जबाबदाऱ्यांवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ. मनोहर पाटील यांनी महाविद्यालयाची गौरवशाली परंपरा सांगत असताना, हा देश बहुजनांचा आहे. त्याच्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजस्विनी वाडिले तर आभार प्रदर्शन यामिनी मराठी यांनी केले. उद्घाटन सत्रानंतर राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सर्वच स्वयंसेवकांनी रॅलीमध्ये सहभागी होऊन अमृतकलशाची मिरवणूक काढली. या प्रसंगी देशभक्तीपर घोषनांनी परिसरातील सर्वच विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला. या रॅलीच्या समारोपत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोहर पाटील यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *