औरंगाबादेत ऑईल डेपो साठी पेट्रोलीअम समिती कडून चाचणी.

.

सबला उत्कर्ष समाचार राजश्री राहुल चौधरी

औरंगाबाद – अनेक वर्षापासून शहरातील प्रलंबित आॅईल डेपो सुरु करण्यासाठी इंडिअन आॅईल अधिकाऱ्यांच्या समिती सदस्यांनी औरंगाबाद शहरात भेंट दिली. आॅईल डेपो सुरु करण्याबाबत (फिजीबिलीटी) उपयोगिता बाबत खा.भागवत कराड ,आमदार अतुल सावे यांनी समिती सदस्याची भेट घेऊन माहिती दिली. राज्यात इतर प्रदेशाला दोन ओईल डेपो असताना मराठवाड्याला एकही ओईल डेपो नाही. नागपूर मुबई समृद्धी महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग,ड्राय पोर्ट ,डीएमआयसी आणि वाहनांची वाढती संख्या याविषयी समिती सदस्यांना माहिती दिली.यावेळी समिती सदस्यांनी ऑरिक सिटी भेटही दिली व डीएमआयसी प्रकल्पाविषयी माहिती जाणून घेतली.

खासदार डॉ. भागवत कराड केंद्रीय पेट्रोलीअम स्थायी समितीचे सदस्य असून, त्यांनी मराठवाडयाच्या विकासाठी औरंगाबादेत ओईल डेपो सुरु करावा अशी मागणी पेट्रोलीअम मंत्री धर्मेंद्र प्रधान,स्थायी समिती अध्यक्ष रमेश बिधुरी यांच्याकडे केली होती. तेल कंपन्याचे चेअरमन यांनी मुबई कार्यालयास औरंगबादेत डेपोसाठी फिजीबलीटी रिपोर्ट देण्यासंदर्भात सूचना केली होती. त्यामुळे आयओसी समिती सदस्य एस.के रविकुमार कार्यकारी व्यवस्थापक ऑपरेशन, रणबीर सिंग कार्यकारी व्यवस्थापक विरतरण आणि पुरवठा, अजय श्रीवास्तव वितरण कार्यकारी व्यवस्थापक वितरण, औरंगाबाद प्रदेशाचे प्रादेशिक अधिकारी सुहास तुमाने यांनी खासदार डॉ.खा.भागवत कराड, आमदार अतुल सावे, यांची उपस्थिती होती. खासदार डॉ. भागवत कराड यांनी तत्कलीन जिल्हाधिकारी उदय चौंधरी यांना ओईल डेपोसाठी शंभर एकर जागा देण्यासंदर्भात मागणी केली होती व जिल्हाधाकारी औरंगाबाद लगत रेल्वेलाईन जवळ जागा शंभर ते दीडशे एकर जागा देण्याविषयी सहमती दर्शविली आहे. .

   मराठवाड्याची राजधानी, राज्याची पर्यटन राजधानी यासह  देशातील महत्वपूर्ण औद्योगिक केंद्र विकसित होत आहे. शहरातील वाढती लोकसंख्या व  वाहनांची संख्या  लक्षात घेता ओईल डेपोस मोठी मागणी आहे. मनमाड येथील पानेवाडी ओईल डेपोवर डीलराना अवलंबून राहावे लागत आहे. रस्ते वाहतुकीचे अंतर जास्त असल्याने मोठा आर्थिक भुर्दंड सर्वसामान्य नागरिक याबरोबर शहरातील  उद्योजकांना बसत आहे. त्यासाठी तातडीने शहरात ओईल डेपो सुरु झाला तर  औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड या जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *