पोलीस हेडकॉन्स्टेबल अजित शेकडे यांना “युवा गौरव” पुरस्कार जाहीर…

युवाशक्ती पत्रकार संघ औरंगाबाद यांनी पाठविले निवड पत्र सर्वस्तरातून होते शेकडे यांचे कौतुक

औरंगाबाद प्रतीनिधि / सबला उत्कर्ष न्यूज…
अजित निवृत्ती शेकडे पोलीस हेडकॉन्स्टेबल सध्या ते पोलीस ठाणे चिकलठाणा येथे कार्यरत आहे. लाँकडाऊन च्या कालावधी मध्ये गोरगरिबांना आर्थिक मदत पाई जानाऱ्या मजुरांना जेवन वाटप केले.वीषेश म्हणजे ९५ वर्षिय महिलेला कोरोना झाला म्हणून नातेवाईकांनी चिकलठाणा हद्दीत कच्ची घाटि मध्ये फेकुन दिले होते त्या आजीची नागरीकान कडुन महिती मीळताच तीला घाटि रुग्णालयात कोवीड सेंटर मध्ये आँडमेट करुन तीचा जीव वाचवीला व तीला मदर टेरेसा आश्रमान नीवारा मीळवुन दिला.
शेकडे हे १९९८ मध्ये पोलीस भरती औरंगाबाद ग्रामीण येथे झाले होते.त्यांनी पोलिस ठाणे बिडकिन येथे असताना पारधी आरोपींवर चांगल्या प्रकारचे गुन्हे उघडकीस चोरी दरोडे या प्रकरणातील पारधी आरोपींना पकडून देण्यास मदत केली होती तसेच १२ तासांमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पी.एस.आय मुंजा मुळे साहेब यांचे पारध्यांनी हिसकावले पिस्टल परत गुन्ह्यामध्ये मिळवून दिले होते.तसेच महामार्ग पोलीस मध्ये भेटला असताना दोन दरोड्याच्या गँग पकडण्यास मदत केली होती.त्यामध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक साहेबांनी ह्या उत्तम कामगिरी बद्ल बक्षीस मिळाले होते तसेच २०१३ पासून पोलीस ठाणे अजिंठा येथे नेमणुकीस असताना अजिंठा डोंगर रांगामध्ये वसलेले आदिवासी बहुसंख्य असलेल्या गावांमध्ये त्या गावांमध्ये हातभट्टीची प्रमाण जास्त प्रमाणात होते तसेच शिक्षणाचा प्रभाव कमी असल्याने शासकीय नोकरीमध्ये व शिक्षणामध्ये इंटरेस्ट कमी मुलांचा इंट्रेस कमी होता त्यासाठी प्रथमता सर्वात बटन वरती कारवाई करून त्यात बट्ट्या नष्ट केल्या तसेच गावामध्ये मीटिंग घेऊन मुलांमध्ये व गावकऱ्यांमध्ये शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले हात बटाट्याच्या परिणाम समजावून सांगितले जे अल्पवयीन लग्न लावले जायचे त्याचे दुष्परिणाम समजावून सांगितले तसेच आदिवासी तडवी भिल कोणी या समाजातील मुलांना एकत्रीकरण करून त्यांना स्पर्धात्मक परीक्षेचे मार्गदर्शन केले सदर स्पर्धात्मक परीक्षेच्या माध्यमातून पोलीस भरती प्रशिक्षण सैन्यदल प्रशिक्षण व इतर शासकीय नोकरी संदर्भात लेखी व मौखिक अप्रत्यक्षरीत्या मैदाने तयार करून लांब उडी गोळा फेक १०० मीटर पाच किलोमीटर डबलबार द्वारे पुलप्स मारणे अशा प्रकारची कार्यक्रम घेऊन त्यामाध्यमातून २०१९ पर्यंत साडे पाचशे ते सहाशे मुलांना सैन्यदलामध्ये भरती होण्यास मदत केली.तसेच शंभर ते सव्वाशे मुले पोलीस दलामध्ये भरती झालेले आहेत व इतर सेक्युरिटी किंवा इतर शासकीय विभागांमध्ये भरती होण्यास मार्गदर्शन केले आहे एकंदरीत मला व पोलीस स्टेशनला या प्रशिक्षणाच्या माध्यमातून ५० गावांमध्ये वर्षभरातील गणपती गणेशोत्सव दुर्गा देवी मोहरम पोळा पाडवा बकरी ईद व निवडणूका यामध्ये ग्राम सुरक्षा दल पोलीस मित्र आम्ही तयार केल्याने कोणत्याही गावांमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न कधीही निर्माण झाला नाही कारण की आम्ही महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीद वाक्य सदरक्षणाय खलनिग्रहणाय याप्रमाणे सर्वश्रेष्ठ कायदा व आपले नैतिक जबाबदारी कायद्याचे रक्षण करणे हे सर्वांना समजावून सांगितले त्यामुळे पोलीस प्रशासनास शांतता प्रस्थापित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत मिळत आहे तसेच चोऱ्या जबरी चोऱ्या किंवा दरोडे यासारखे प्रकार टाळण्यासाठी देखील या नव तरुणांची चांगल्या प्रकारे मदत मिळाली तसेच सदर पाच वर्षाच्या कालावधीमध्ये व्यसनाधीन ते वरती चांगल्या प्रकारचे उपक्रम राबवले ड्रंक अँड ड्राइव्ह च्या केसेस करून दारू पिणार यांना मान्य कोटात दंड केला तसेच धार्मिक सप्ताहाच्या माध्यमातून महाराज लोकांना देखील व्यसनाधीन ते वरती प्रवचन करण्यास विनंती करून अनेक लोकांना व्यसनधिन ते पासून परावृत्त करण्यास मदत त्यांनी केली आहे.विशेष म्हणजे ग्रामसुरक्षा दल व पोलीस मित्र यांच्यामुळे ,२५ लाखाच्या झाल्या दरोड्याचा शोध लावण्यासाठी आम्हाला फक्त तीन तास लागले असे त्याच्या जीवनातील मोठा प्रसंग आहे.
शेकडे यांना याआधिहि उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांना विविध पुरस्काराने गौरवण्यात आले आहे त्यापैकी पोलीस खात्यातील पोलीस महासंचालक पदत देवुन गौरविण्यात आले आहे.माणुसकी समुहातर्फे देखील त्यांना सेवा गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.ह्या सर्व कार्याची दखल घेत युवाशक्ती पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा संपादक अब्‍दुल कयूम व त्यांच्या सदस्य मंडळांनी शेकडे यांची निवड केली आहे. 15 वा वर्धापन दिनानिमित्त औरंगाबाद युवा व युवा पत्रकार संघातर्फे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम साध्या पद्धतीने ४ ऑक्टोंबर रोजी होणार आहे असे पत्राद्वारे कळविण्यात आले आहे.ह्या पुरस्काराने समाजात व पोलीस खात्यातर्फे शेकडे यांचे कौतुक होत आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *