गॅस एजन्सी देण्याचे आमिष; एकाची साडेनऊ लाखात फसवणूक…

गॅस एजन्सी देण्याचे आमिष; एकाची साडेनऊ लाखात फसवणूक

जळगाव प्रतिनिधी ( मयुर वाघुळदे ) :-भारत गॅस एजन्सीची डिलरशीप देतो असे सांगून ९ लाख ५० हजार रूपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी एकावर सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, दिलीप हरसिंग राठोड (वय-४८) रा. जळगाव यांना हे प्राध्यापक आहेत. ३० डिसेंबर २०२० ते १४ जानेवारी २०२१ दरम्यान अनोळखी व्यक्ती अशोक चक्रवर्ती आणि रवि कुमार असे बनावट नाव सांगणाऱ्या व्यक्तीनी राठोड यांना भारत गॅस एजन्सीची डिलरशिप देतो असे सांगून भारत सरकारची राजमुद्रा असलेले व राजमुद्रावर गव्हरमेंटर ऑफ इंडीयाचा शिक्का मारून बनावट कागदपत्रे तयार केली. ही बनावट कागदपत्रे खरी असल्याचे भासवून त्यावर पुन्हा भारत गॅस कॉर्पोरेशन लिमीटेडचा लोगो व नाव तयार करून बनावट मेल आयडीवरून दिलीप राठोड यांच्या मेल आयडीवर पाठविले. पाठविलेल्या मेल आयडीमध्ये बँकेचे नाव व खाते क्रमांक पाठवविला. राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार बँक खात्यात ९ लाख ५० हजार रूपयांची रक्कम भरली. पैसे भरूनही भारत गॅस एजन्सीची डिलरशिप देण्यासाठी टाळाटाळ केली. आपली फसवणूक होत असल्याचे समजताच राठोड यांनी सायबर पोलीस ठाण्यात दोन जणांविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बळीराम हिरे करीत आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *