गोंडपिपरी तालुक्यातील येनबोथला येथे रा.काँ.च्या शाहीन भाभी हकीम यांची भेट!

कौटुंबिक नात्यालाच हैवानियत आरोपीने गालबोट लावले आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी केले
पीडित मुलीची व परिवाराची भेट घेतले!

गडचिरोली– चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील येनबोथला येथे एका अल्पवयीन मुलीवर स्वतःच्या काकानेच पूतनीवर अतिप्रसंग करून कौटुंबिक नात्यालाच गालबोट लावल्याने राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्षाचे चंद्रपूर जिल्हा निरीक्षक शाहीन भाभी हकीम यांनी रविवार 4 ऑक्टोंबर रोजी पीडित परिवाराची भेट घेऊन पीडित मुलीची आस्थेने विचारपूस केले व कुटुंबाचे सांत्वन करून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी केले.


दुर्घटनेच्या दिवशीच म्हणजे गत शुक्रवारी मुलीचे आजोबाचे निधन झाल्याने अंत्यविधी आटोपल्या नंतर पाहुण्यांचे खान-पान सुरू असतांना मद्यधुंद व हैवानियत अवस्थेत असलेला आरोपी कमलाकर राऊत यांनी कौटुंबिक नात्यालाच काळिमा फासले. आधीच कुटुंबातील वयोवृद्धाचे निधन झाल्याचे दुःख व चिंता असतांना स्वतःच्या चुलत काकानेच पुतणीवर बळजबरी करून पीडित परिवाराला अजून संकट व चिंतेच्या खाईत ढकलले आहे.
अंगावर शहारे आणणारी दुर्घटनेची बाब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला निरीक्षक शाहीन भाभी हकीम यांना समजताच पिडीतीच्या प्रत्यक्षात घरी जाऊन भेट दिले. व पीडित मुलीला न घाबरता निर्भीडपणे पुढे येण्याचे व अशा विकृती, कुकर्म कृत्याच्या मानसिकतेचे तीव्र शब्दात निषेध करून मुलीच्या व परिवाराच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभी राहणार असल्याचे शाहीन भाभी हकीम यांनी यावेळी आवर्जून सांगितले.


तसेच पीडित मुलीचे माध्यमिक वर्गात शिक्षण सुरू असून परिवार गरीब असल्याने भविष्यातील पुढील महाविद्यालयीन शिक्षणासाठी सर्वोतोपरी मदत करणार असल्याचे सांगून दर्जेदार व उच्च शिक्षणासाठी पीडित मुलीचे आत्मविश्वास वाढविले.
सैतानी विचाराचा, हैवानियत आरोपी मोरेश्वर राऊत याला जेरबंद तर करण्यात आले पण त्याच्यावर कठोरातील कठोर शिक्षा करण्याची एकमुखी मागणी करून यापुढे असले घाणेरडे प्रकार खपवून घेणार नसल्याचे ठणकावून सांगितले.
पीडित परिवाराची सांत्वनपर भेट घेतांना त्यावेळी सोबत राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुष्पाताई अलोने, येनबोथला येथील माजी सरपंचा वर्षाताई कन्नाके, सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र भाऊ अलोने, सूरज माडूरवार, राजकुमार भडके, बाबू शेख आदी उपस्थित होते.

आशिष सुनतकर
गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी ( सबला उत्कर्ष न्यूज )

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *