कोरडे प्रकल्प पूर्णभरणा करून सिंचना खाली आणणार -खासदार उन्मेश पाटील…

पारोळा येथे पाटबंधारे प्रकल्प अधिकारी वर्गाची बैठक – खासदार उन्मेश पाटील यांनी घेतला आढावा…

पारोळा – सबला उत्कर्ष प्रतिनिधी : यंदा वरुण राजाची सर्वत्र लॉक कृपा असून मतदार संघातील अनेक धरणे,पाझर तलाव भरले आहेत. मात्र जे तलाव अथवा प्रकल्प भरले नसतील त्यांना जवळच्या प्रकल्पातून भरण्यासाठी काय उपाययोजना करता येतील जेणेकरून सिंचनासह पिण्याचा प्रश्न सुटेल यावर भर देण्यासाठी अधिकारी वर्गास सूचना देण्यात आल्या असून मतदारसंघात शंभर टक्के सिंचनासाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही खासदार उन्मेश दादा पाटील यांनी व्यक्त केली आहे.

आज खासदार उन्मेश दादा पाटील यांनी गिरणा पाट बंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ध.ब.बेहरे , त्यांच्या सर्व अधिकारी अभियंता यांची बैठक पारोळा
शासकीय विश्राम गृहात बोलावली होती. यावेळी त्यांनी आपल्या भावना प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.


याप्रसंगी खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या सह ,नगराध्यक्ष करन दादा पवार,नगरसेवक दीपक अनुष्ठान,डी बी पाटील गिरणा पाट बंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ध.ब.बेहरे ,उपविभागीय अधिकारी एरंडोल चे एम आर अत्तरदे ,उपविभागीय अभियंता जळगाव चे एम आर मिठ्ठे,आर डी पाटील (उपविभागीय अधिकारी भडगाव) ,व्ही एम पाटील,अजिंक्य पाटील एस पी चव्हाण पी जे काकडे (पारोळा बोरी विभाग) उपस्थित होते.
खासदार उन्मेश दादा पाटील पुढे म्हणाले की भोकरबारी, म्हसवे,कंकराज,
शिरसमणी,पिंपळकोठे आर्डी, निसरडी ,अंजनी ,पांझण प्रकल्प ,जामदा डावा व उजवा कालवा, निम्न गिरणा आदी धरणे,पाझर तलाव यांचा पातळी,साठा बाबत मतदार संघातील सर्व म्हणजे मोठा प्रकल्प ,दोन मध्यम तसेच सव्वीस पाझर तलावांचा आढावा घेतला . तसेच पारोळा ता बोखरबारी धरणात अजूनही अवघा 13 टक्के साठा असून यावर 12 गावे अवलंबून असल्याने गिरणेतून गरजू पाझर तलावात पाणी सोडण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचना अधिकारी वर्गास देण्यात आल्या तलावांचे पुनर्भरण करणे जास्तीत जास्त क्षेत्र पिण्यासह सिंचनासाठी उपयोगी करणे ज्यात सत्तर हजार हेक्टर क्षेत्र सामावून घेतले जाईल अश्या पद्धतीचे नियोजन बाबत आदेश दिले गेले . याप्रसंगी खासदार उन्मेश दादा पाटील व उपस्थित लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी धरणगाव रस्त्यावरील म्हसवे धरणातून भोकरबारीकडे जाणाऱ्या पाटचाऱ्यांची पाहणी केली. सबला उत्कर्ष प्रतिनिधी ….

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *