सिरततून नबी प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम नवशिन, द्वितीय हम्माद तर तुतीय मिसबाह, पालकांनी मुलांच्या कर्तव्याकडे लक्ष द्यावे- मौलाना हुजेफ़ा वस्तानवी

*सिरततून नबी प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम नवशिन, द्वितीय हम्माद तर तुतीय मिसबाह*

*पालकांनी मुलांच्या कर्तव्याकडे लक्ष द्यावे- मौलाना हुजेफ़ा वस्तानवी*

जळगाव – लहानपणापासून मुलं आणि मुलींवर अंतिम प्रेषितांनी सांगितलेले व प्रत्यक्ष अमलात आणलेले कर्तव्य जर पालकांनी निभवले तर समाजात विशेषता तरुणांमध्ये जनजागृती करण्याची गरज भासणार नाही व समाज प्रगतीपथावर येईल असे आवाहन मौलाना हुजेफा वस्तानवी यांनी केले. रविवारी जळगाव येथील महानगरपालिका शाळा क्रमांक ३६/५६ च्या मैदानावर आय. वाय. एफ इस्लामिक युथ फेडरेशन यांनी आयोजित केलेल्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. व्यास पिठावर मुख्य अतिथी म्हणून आय वाय एफ चे राज्य सचिव परवेज नदीर, प्रोफेसर इलियास खान, मुंबई विशेष अतिथी म्हणून जळगाव अरबी मदरसाचे कारी अकील, इकरा चे डॉ करीम सालार, मनियार बिरादरीचे फारुक शेख व मुफ्ती अतिकूर रहेमान होते.

*सिरतून नबी अर्थातच अंतिम प्रेषित मोहम्मद यांचे जीवन चरित्र*मोहम्मद (स) यांच्या जीवन चरित्रावर आय वाय एफ ने प्रश्न मंजुषा स्पर्धेचे आयोजन केले होते इयत्ता ८ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा होती. यात एकूण ५०५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यातील प्रथम उत्कृष्ट ३ विद्यार्थ्यांना स्टडी टेबल, रेंजर सायकल व कम्प्युटर देऊन गौरव करण्यात आला तर उत्तेजनार्थ पारितोषिक एकूण ८३ विद्यार्थ्यांना स्कूल बॅग व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले.*विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन*प्रोफेसर इलियास यांनी शिक्षक, शैक्षणिक संस्था व पालक यांचे विद्यार्थ्यांबाबत असलेले कर्तव्य विशद केले. परवेज नादिर यांनी अंतिम प्रेषितांशी खऱ्या प्रमाणात जर प्रेम व्यक्त करायचे असेल तर ऐतिहासिक उदाहरणे देऊन त्यांनी प्रेषितांचे कशाप्रकारे आपले सहकारी प्रेम करीत होते हे त्यांनी उदाहरणासहित विशद केले. अध्यक्षीय भाषणात मौलाना हुज़ेफ़ा वस्तानवी यांनी पालकांचे मुलांबाबत व मुलांचे पालकांबाबत कर्तव्य विशद करून आज समाजात दोघांनी आपले कर्तव्य निभवली तर समाज कसा प्रगती पथावर जाईल हे स्पष्ट केले. करीम सालार व फारुक शेख यांचे सुद्धा समायोचीत भाषणे झाली.*स्पर्धे साठी ठरलेले उत्कृष्ट ३ शिक्षक*१)तय्यब शेख इब्राहिम (अँग्लो उर्दू जळगाव)२) सौ नसरीन सिद्दिकी (मिलत हायस्कूल)३)शकील खान ( इकरा मोहाडी)*स्पर्धेतील टॉप थ्री विद्यार्थी*१)नवशीन आसिफ पटेल कॉम्प्युटर विजेती २)हम्माद शेख मेहमूद रेंजर सायकल विजेता३) मिसबाह अस्लम खान स्टडी टेबल विजेतीकार्यक्रमाची प्रस्तावना आय वाय एफ जळगावचे अध्यक्ष मुस्तफिज अहसन यांनी सादर केली व संघटनेचे कार्य विशद केले त्यात प्रामुख्याने समाजात विशेषता तरुणांमध्ये धार्मिक अखंडता वाढवणे व प्रबोधन करणे हे कार्य असल्याने तरुणांमध्ये अंतिम प्रेषितांच्या जीवन चारित्र्यावर प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी विशद केले.कार्यक्रमाची सुरुवात तिलावत ये कुरानपाक ने हमीज खान यांनी केली तर नात हुजेफा अतिक यांनी सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहम्मद अहेसन व आभार मुस्तफिज यांनी मानले. कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात पुरुष महिलांसोबत विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.फोटो कॅप्शन१) विजेते स्पर्धकांसोबत खुर्चीवर बसलेले प्रमुख अतिथी सर्वश्री मौलाना हुजेफा, परवेज नादिर, प्रोफेसर इलियास खान, करीम सालार, फारुक शेख, कारि अकील आदी दिसत आहे.२)स्पर्धेतील प्रथम पारितोषिक स्वीकारताना नवशिन आसिफ, द्वितीय हम्माद शेख मेहमूद व तृतीय मिसबाह असलम खान दिसत आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *