मला बदनाम करण्याचं शल्यं माझ्या मनात आहे. त्यामुळेच भाजपा सरकार सत्तेत आले नाही – एकनाथराव खडसे…

मुक्ताईनगर : सबला उत्कर्ष ( मंगेश सोनवणे ) : माझं तिकीट कापलं, माझ्या मुलीला हरवण्यासाठी प्रयत्न केला. याबबतचे सर्व पुरावे मी दिले आहेत तरी देखील कारवाई होत नाही? भाजपमध्ये नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.


मी मुख्यमंत्री पदाचा प्रबळ दावेदार असल्याने मला योग्यपणे संपवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र मी सहजासहजी संपणारा, स्वस्त बसणारा राजकारणी नाही.
माझ्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप खोटे आहेत. अनेकांवर घोटाळ्यांचे आरोप झालेत सर्वांना क्लीन चिट मिळते. मग मला क्लीनचिट का मिळत नाही? लवकरच अनेक रहस्यांचा उलगडा होईल, असा गौप्यस्फोट खडसे यांनी केला आहे.
“बाकीच्यांवर कारवाई होत नाही. माझ्यावर का कारवाई करण्यात आली. माझ्यावरचे खोटे आरोप आतापर्यंत सिद्ध करू शकले नाही. बदनाम करण्यासाठी काही विशिष्ट लोकांनी मीडिया ट्रायल केली होती.

जाणीवपूर्वक मला पदावरून बाजूला करण्याचा प्रयत्न केला. भ्रष्ट लोकांना पक्षामध्ये घेतले. मात्र ज्यांनी चाळीस वर्ष जिवाचं रान केले त्यांच्या जीवाची कदर नाही का?”,असंही खडसे म्हणाले.
“मी असा काय गुन्हा केला. जे लोक या विधानसभेत आडवे येत होते त्यांना आडवे करण्याचे काम यात करण्यात आले. मी कधीच पक्षावर टीका केली नाही. आम्ही कष्टाने आणलेलं भाजपचं सरकार गेल्याची खंत असल्याचे खडसे यांनी सांगितले.”

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *