वन्य प्राण्यांमुळे उभ्या पिकांची नुकसान… शेतकऱ्यांवर आले पुन्हा मोठे संकट.

आशिष सुनतकर
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली ( सबला उत्कर्ष न्यूज ) –

अहेरी :-
अहेरी तालुक्यातील देवलमरी अहेरी महागाव इंदाराम चेरपल्लि परिसरात गोसीखुर्द धरणाचे पाणी सोडल्याने नदीला महापूर आले होते. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या हातातील पीक नष्ट झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान झालेल्या पिकांचा शासनाकडून मोबदला कधी मिळणार याच्या प्रतीक्षेत कसेबसे जीवन जगत आहेत. मात्र अजूनही शेतकऱ्यांचे संकट काही टळले नाही. शेतकऱ्यांच्या शेतात वन्य प्राणी येऊन मका, धान, कापसाचे नुकसान करत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. त्यामुळे आता जीवन जगायचे तरी कसे असा प्रश्‍न शेतकऱ्यांच्या समोर उभा ठाकला आहे.
यावर्षी शेतकऱ्यांवर एकापाठोपाठ अनेक समस्यांचा घात होत असल्याने शेतकर्‍यांची दैनावस्था झाली आहे. त्यामुळे जीवन जगायचा तरी कसा असा प्रश्‍न शेतकऱ्यांच्या समोर उभा आहे. शेतकरी कसेतरी काबाडकष्ट करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. इंदाराम येथील तुळशीराम दहागावकर यांच्या शेतातील उभ्या मक्याच्या पिकात वन्यप्राण्यांच्या कळप येऊन पिकाचे नुकसान केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांचे केलेल्या नुकसान भरपाईचे पंचनामे करून आर्थिक मदत करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *