तापी नदीकाठच्या गावतील नागरिकांनी सावधानतेचा इशारा…

जळगाव : दि. 29 – सबला उत्कर्ष ( संजय चौधरी ) जिल्ह्यातील हतनूर धरण क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सध्या धरणाचे चोवीस दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहे. सध्या धरणातून तापी नदीपात्रात 1 लाख 21 हजार 430 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

ब-हाणपूर परिसर व धरण क्षेत्रात सतत पाऊस सुरू असल्याने संध्याकाळपर्यंत धरणातून अजून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येईल. असे हतनूर पाटबंधारे विभागाचे उपअभियंता श्री. महाजन यांनी कळविले आहे.

तरी तापी नदी काठावरील गावातील नागरिकांनी सावधानता बाळगावी. तसेच कोणीही नदी पात्रात जावू नये. आपली जनावरे नदीपात्रात जाणार नाही याची दक्षता घ्यावी. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *